bhandara
bhandara

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भंडाऱ्यात मृत्यूचे थैमान!

भंडारा : भंडारा Bhandara  जिल्ह्यात कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेने Second Wave थैमान घातले असून ह्या लाटेच्या प्रकोपात तब्बल 665 लोकांना मृत्युमुखी Deaths पडावे लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाने मृत पावणाऱ्यांची संख्या 1 हजार 9 वर गेली आहे. एकाच वेळी 20-25 कोरोनाबाधित मृतावर अंत्यसंस्कार Funeral करावे लागले असल्याने मृत्यु पूर्वीच सरण रचुन ठेवण्याची दुर्देवी वेळ भंडारा प्रशासनावर Bhandara Administration आली आहे. Deaths Increased In Second Wave Of Corona In Bhandara  

हे देखील पहा-

अंत्यसंस्कारासाठी कोणालाही ताटकळत राहण्याची वेळ येऊ नये म्हणून  भंडारा जिल्हा प्रशासनाकडून ऍडव्हान्स मध्ये सरण रचुन ठेवले जात आहे. त्यासाठी दररोज 2 ते 3 ट्रक लाकूड लागत आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने 38,627 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. या लाटेने 665 लोकांना मृत्यूच्या कवेत ही घेतले आहे.

भंडारा जिल्ह्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे तांडव पाहिले असून मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना भंडारा शहरालगत असलेल्या गिरोला स्मशानभूमीत रोज 20 ते 25 लोकांवर अंतसंस्कार केले जात आहेत.  Deaths Increased In Second Wave Of Corona In Bhandara  

तर भंडारा जिल्ह्यात आता पर्यंत 1009 कोरोना ग्रस्तांचा मृत्यु झाला असून भंडारा नगर परिषदेच्या  5 कर्मचाऱ्यांनी ह्या सर्व मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने निर्माण केलेले हे भयावह दृश्य अत्यंत विदारक आहे. 

Edited By : Krushna Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com