VIDEO | गॉडफादर नसताना संघर्षानं झाले कॅबिनेट मंत्री

VIDEO | गॉडफादर नसताना संघर्षानं झाले कॅबिनेट मंत्री

कुणी रिक्षा चालवायचं.. कुणी भाजी विकायचं.. कुणी पानटपरी चालवायचं.. पण आज ते सगळे राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री आहेत. आम्ही बोलतोय.. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत.. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असे अनेक चेहरे आहेत ज्यांचा प्रवास सामान्य ते असामान्य असा राहिलाय. कोणी गॉडफादर नसतानाही अनेकांनी स्वत:च्या हिमतीवर मंत्रिपदापर्यंत मजल मारलीय. 

एकनाथ शिंदे : रिक्षाचालक ते कॅबिनेट मंत्री 
उदरनिर्वाहासाठी एकनाथ शिंदे यांना अनेक कामं करावी लागली. सुरुवातीच्या काळात ते एका कारखान्यात सुपरवायझर होते. मात्र नंतर त्यांनी रिक्षाचालक म्हणून काम सुरु केलं. रिक्षाचालक ते शाखाप्रमुख आणि शाखाप्रमुख ते कॅबिनेटमंत्री असा थक्क करणारा प्रवास एकनाथ शिंदेंनी पार पाडलाय. 

 गुलाबराव पाटील : ठाकरे सरकारमधील सध्याचा आक्रमक शिवसैनिक म्हणून पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील ओळखले जातात. पण गुलाबराव पाटील कधीकाळी पानटपरी चालवायचे. पानटपरीवाल्याला बाळासाहेबांनी मंत्री बनवलं, अशी आठवण सांगतात. गुलाबराव पाटील हे जळगावजवळच्या पाळधी या खेड्यात पानटपरी चालवत होते. या पानटपरीचं नाव नशीब असं होतं. कधीकाळी पानटपरीवाला असणाऱ्या गुलाबराव पाटलांचं नशीब मेहनतीनं आणि निष्ठेनं पालटलं. आज गुलाबराव कॅबिनेट मंत्री आहेत.

छगन भुजबळ : मूळचे शिवसैनिक असलेले छगन भुजबळ यांची राजकीय कारकीर्द मोठी आणि तितकीच रंजक आहे. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक ते आताचे राष्ट्रवादीचे नेते व्हाया काँग्रेस असा भुजबळांचा प्रदीर्घ राजकीय प्रवास आहे. पण त्यापूर्वीचा भुजबळांचा प्रवासही संघर्षपूर्ण आहे. भुजबळ हे पूर्वी मुंबईतील भायखळा मार्केटमध्ये भाजीविक्रीचं काम करत होते. तरुणपणी ते शेती आणि शेतीवर आधारित व्यवसाय करत होते. मात्र अगदी सुरुवातीपासून त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात रस होता. भुजबळ आज ठाकरे सरकारमध्ये अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री आहेत. भाजीवाला ते कॅबिनेटमंत्री असा हा संघर्ष होता.

घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळावर सडकून टीका झाली. पण त्याच मंत्रिमंडळात असेही चेहरे आहेत ज्यांनी गॉडफादर नसतानाही स्वत:च्या हिमतीवर मंत्रिपदापर्यंत मजल मारली. त्यामुळेच या आमदारांचा मंत्रिपदापर्यंतचा प्रवास संघर्षाचा आणि प्रेरणादायी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com