पहा व्हिडीओ : भर मंडपातच नवरीने केली नवऱ्याची धुलाई

सध्या एका नवरा बायकोचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या Video मध्ये ती आपल्या लग्नातच नवरदेवाला चक्क मारताना दिसून येत आहे.
पहा व्हिडीओ : भर मंडपातच नवरीने केली नवऱ्याची धुलाई
पहा व्हिडीओ : भर मंडपातच नवरीने केली नवऱ्याची धुलाईSaamTV

मुंबई : लग्न (Marriage) म्हणजे नवीन वधू वरांनी लाजून भटजीने सांगेल ते विधी पार पाडणं आणि नवऱ्यापेक्षा जास्त नवरी लाजलेलं आपण आजपर्यंत पाहिलं आहे. मात्र सध्या एका नवरा बायकोचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या Video मध्ये ती आपल्या लग्नातच नवरदेवाला चक्क मारताना दिसून येत आहे. मात्र तिने आपल्या नवऱ्याला मारण्याच कारण देखील योग्यच असल्य़ाचं व्हिडीओ पाहणारे म्हणत आहेत.

पहा व्हिडीओ -

कारण आपल्याच लग्नात होणाऱ्या बायकोसमोर जर कोणी गुटखा खाऊन बसलं असेल तर ते कोणत्या बोयकोला आवडणार?? आणि म्हणूनच सोशल मिडीयावरती देखील लोकं तीच कौतूक करताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ (Video) बघीतल्यानंतर तुम्हालाही बायकोने केलं तेच योग्य असं वाटेल या व्हिडीओमध्ये नवरा-नवरी दोघेही पाटावर पूजेला बसले असतानाच नवऱ्याने गुटखा खाल्ला ते पाहून त्या नवरीचा संताप अनावर झाला आणि थेट सर्वांसमोरच नवदेवाची धुलाई सुरू केली. आणि नवरदेवाला आधी गुटका थुंकून ये असं सांगितलं. या घटनेचा व्हडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

पहा व्हिडीओ : भर मंडपातच नवरीने केली नवऱ्याची धुलाई
दुर्दैवी : 5 महिन्याच्या बाळाला आईनेच फेकले पाण्याच्या ड्रममध्ये; चिमुकल्याचा मृत्यू !

मुलीचे असे रौद्र रूप बघून नवरदेवाचं देखील काहीही बोलण्याचं धाडस झालं नाही. तो देखील विधी सोडून पाटावरून उभा राहतो. लग्न समारंभात आलेल्या पाहुण्यांपैकीच एकाने या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केलाय जो सध्या वेगाने प्रचंड व्हायरल झाला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com