India Inflation: सर्वसामान्यांना पुन्हा झटका, फेब्रुवारीत घाऊक महागाई 13.11 टक्क्यांवर!

फेब्रुवारी महिन्यातील महागाईची (Inflation) आकडेवारी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक 13.11 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो जानेवारी महिन्यात 12.96 टक्के होता.
India Inflation
India InflationSaam Tv

फेब्रुवारी महिन्यातील महागाईची (Inflation) आकडेवारी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक 13.11 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो जानेवारी महिन्यात 12.96 टक्के होता. फेब्रुवारी 2021 मध्ये घाऊक महागाई दर फक्त 4.83 टक्के होता. जानेवारीमध्ये घाऊक महागाईचा दर 12.96 टक्के होता. डिसेंबर 2021 मध्ये, घाऊक महागाई दर 13.56 टक्के होता, जो 14.3 टक्के झाला आहे. नोव्हेंबरमध्ये ही महागाई 14.23 टक्के होती. सलग 11व्या महिन्यात घाऊक महागाईचा दर वाढला गेला आहे. वाढती महागाई ही, सरकार, अर्थव्यवस्था आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासाठी (Reserve Bank Of India) गंभीर चिंतेची बाब आहे.

आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2022 मध्ये खाद्यपदार्थांची महागाई जानेवारीत 10.33 टक्क्यांवरून 8.19 टक्क्यांवर आली. त्याचप्रमाणे, आढाव्यातील महिन्यात भाज्यांची महागाई 26.93 टक्‍क्‍यांवर होती, जी जानेवारीत 38.45 टक्‍क्‍यांवर पोहोचली होती. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने (Ministry of Commerce and Industry) एका निवेदनात म्हटले आहे की, "फेब्रुवारी 2022 मध्ये महागाई वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे खनिज तेल, मूळ धातू, रसायने आणि रासायनिक उत्पादने, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि खाद्येतर वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ आहे."

जानेवारीत 9.42 टक्क्यांच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये उत्पादित वस्तूंची महागाई 9.84 टक्के होती. फेब्रुवारीमध्ये इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाई 31.50 टक्क्यांवर होती. जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे कच्च्या पेट्रोलियमची महागाई जानेवारीत 39.41 टक्क्यांवरून 55.17 टक्क्यांवर पोहोचली आहे.

हे देखील पहा-

सिटी बँकेने महागाईचा अंदाज काय लावला ?

बदललेल्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सिटी बँकेने पुढील आर्थिक वर्षासाठी महागाई दरात वाढ केली आहे. त्‍याने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी चलनवाढीचा अंदाज 70 आधार अंकांनी 5.7 टक्‍क्‍यांनी वाढवला आहे. कच्च्या तेलाची (Crude oil price) किंमत प्रति बॅरल 110-120 डॉलरच्या श्रेणीत राहिल्यास पुढील आर्थिक वर्षात भारतातील सरासरी किरकोळ महागाई दर 6.3 टक्क्यांवर पोहोचेल, असे त्यांनी आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com