महाराष्ट्र पुन्हा मास्कसक्ती होणार? केंद्राचे पाच राज्यांना पत्र

गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेण्यात आले.
Mask
Masksaam tv

नवी दिल्ली - गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे (Corona) सर्व निर्बंध मागे घेण्यात आले. तब्बल दोन वर्षांपासून असलेली मास्क सक्ती हटवण्यात आल्यामुळे नागरिकांनीही मोकळा श्वास घेतला. पण आता पुन्हा एकदा मास्क सक्तीचा निर्णय महाराष्ट्रात (Maharashtra) लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोक वर काढले आहे.

चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने पाच राज्यांना पंचसुत्रीचे पालन करण्यासाठी पत्र आले आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, मिझोराम या राज्यांचा समावेश आहे. या पाच राज्यांत पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या ५ राज्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि योग्य त्या उपाययोजनेसाठी पावलं उचलण्याच्या सूचना केल्या आहेत.

महाराष्ट्राची आकडेवारी काय?

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 127 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 7,876,041 इतकी झाली आहे. तर मंगळवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील कोरोना बळींची संख्या ही 1,47,830 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासात 108 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्याची संख्या 77,27,551 झाली आहे. सध्या राज्यात 660 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com