५० रुपयांत दारु देणार; नेत्याचे आश्वासन

भाजपमधील तेथील काही कार्यकर्ते अध्यक्षांनी (वीराराजू) अप्रत्यक्षपणे मद्याची वाढलेली किंमतीकडे लक्ष वेधल्याचे सांगत आहेत.
liquor
liquor

आंध्र प्रदेश : राज्यातील एक काेटी जनता मद्यपान करते. तुम्ही सर्वांनी आम्हांला (भाजपला) मतदान द्या मद्याची (दारु) किंमत कमी करु (Rs 50 liqour) असे आश्वासन राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख साेमू वीराजू यांनी जनतेस एका जाहीर सभेत दिले. दरम्यान गेल्या काही दिवासांपासून काही भाजप नेत्यांच्या वर्तनावरुन समाज माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र माेदी चले जावाे GoBackModi असा ट्रेंड निर्माण झाला आहे.

आंध्र प्रदेशात (andhra pradesh) आगामी काळात हाेणा-या विधानसभा निवडणुकीत (election) भाजपला जिंकून द्या असे आवाहन करताना भाजप नेते सोमू वीराजू (somu veeraju) यांनी अनेक उपक्रमांसोबतच प्रति बाटली पन्नास रुपय मद्य (liqour) देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी वीराजू यांनी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस सरकार आणि विरोधी तेलुगू देसम पक्षावर टीका देखील केली. वीरराजू म्हणाले राज्याचा विकास करण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत.

पुढं बाेलताना वीराराजू म्हणाले राज्यातील एक कोटी जनता मद्यापन करते. तुम्ही सर्वांनी भाजपला (bjp) मत द्या, आम्ही तुम्हांला ७५ रुपयांत मद्य देऊ. जर महसूल चांगला मिळाला तर केवळ ५० रुपयांत (Rs 50) मद्य (liquor) पुरवठा करू असे सांगताना मद्य निश्चितच चांगले देऊ हे बाेलण्यास ते विसरले नाहीत. दरम्यान वीरराजू यांच्या ५० रुपयांत मद्य या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. अनेक जण त्यांच्यावर आणि भाजप पक्षावर टीका करु लागले आहेत. भाजपमधील तेथील काही कार्यकर्ते अध्यक्षांनी (वीराराजू) अप्रत्यक्षपणे मद्याची वाढलेली किंमतीकडे लक्ष वेधल्याचे सांगत आहेत.

liquor
ED ची चार्जशिट दाखल; अनिल देशमुख मुख्य आरोपी, मुलांचीही नावे

राज्य सरकारच्या काही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनांचा संदर्भ देताना वीराराजू म्हणाले सरासरी एक व्यक्ती दरमहा सुमारे १२ हजार रुपयांचे मद्य पितात आणि जगन मोहन रेड्डी ती सर्व रक्कम गोळा करत आहेत आणि योजनेच्या नावावर परत देत आहेत. आंध्र प्रदेशात सत्तेवर आल्यास अमरावतीस राजधानी बनवण्यासाठी आणि अवघ्या तीन वर्षांत या प्रदेशाचा विकास करण्यासाठी भाजप कटिबद्ध राहिल असे स्पष्ट केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com