Train Accident: ट्रेन चालवताना महिला मोबाईल बघण्यात दंग; अचानक समोरून दुसरी ट्रेन आली अन्... थरकाप उडवणारा VIDEO

Train Accident Viral Video: ही महिला मोटारमन मोबाईलमध्ये इतकी गुंग झाली आहे की, तिला आपण ट्रेन चालवतोय याचे देखील भान राहिलेलं नाही.
 Two Train Accident Viral Video
Two Train Accident Viral VideoSaam TV

Train Accident Viral Video: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. हायस्पीड इंटरनेटमुळे मोबाईल फोनची क्रेझ लोकांमध्ये वाढतच चालली आहे. रात्री झोपताना, सकाळी उठताना, जेवताना किंवा प्रवार करताना प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. अशातच गाडी चालवताना मोबाईलचा वापर टाळा, असं पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येत. कारण, यामध्ये मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. (Latest Marathi News)

आजवर गाडी चालवताना मोबाईलचा वापर केल्याने अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. काहींना गंभीर दुखापत तर कोणाचा सुदैवाने जीवही वाचला आहे. तरी देखील काहींची ही सवय मोडत नाही. अशा मंडळींचे डोळे उघडवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक महिला ट्रेन चालवताना दिसत आहे.

 Two Train Accident Viral Video
Viral News: ऐकावं ते नवलंच! बायकोनेच गर्लफ्रेंडसोबत लावलं नवऱ्याचं लग्न; आता तिघेही नांदतात सुखाने

ट्रेन चालवत असताना ही महिला मोटारमन मोबाईलमध्ये इतकी गुंग झाली आहे की, तिला आपण ट्रेन चालवतोय याचे देखील भान राहिलेलं नाही. अशातच या महिलेच्या एका चुकीने अपघात होतो आणि ज्याचे परिणाम ट्रेनमधील प्रवाशांना भोगावे लागतात. (Breaking Marathi News)

ट्रेन भरधाव वेगात असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनकडे या महिलेचं लक्ष जात नाही. मोबाईलमध्ये लक्ष असल्यामुळे आपल्या ट्रेन समोरून दुसरी ट्रेन येत आहे, याचा अंदाज तिला लागत नाही. तिचं लक्ष जाण्यापूर्वीच दोन्ही ट्रेन (Train Accident) एकमेकांवर आदळतात. जेव्हा दोन्ही ट्रेनची धडक झाली तेव्हा ही महिला चालक भानावर येते. पण तोपर्यंत उशीर झालेला होता.

दोन्ही ट्रेन भरधाव वेगात एकमेकांवर आदळ्याने ट्रेनमधील प्रवासी देखील उडून खाली पडतात. यात काही प्रवाशांना गंभीर दुखापत देखील झाल्याचं दिसतंय. अंगाचा थरकाप उडवणारी ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या महिलेच्या करामतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे.

हा व्हिडीओ नेमका कोणत्या देशातील आहे? याची माहिती कळू शकली नाही. मात्र, हा व्हिडीओ 'सीसीटीव्ही इडीयट' या ट्वीटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १ कोटींपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पहिले असून, सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी या महिलेवर कारवाईची मागणी करताहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com