Wagah Border: कोरोनामुळे पर्यटकांना वाघा बॉर्डरवर प्रवेशबंदी, छोट्या दुकानदारांवर उपासमारीची वेळ

कोरोनामुळं भारत पाक सीमेवरील वाघा बॉर्डर वर सध्या पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आलीये.
Wagah Border
Wagah BorderSaam Tv

वाघा बॉर्डर: कोरोनामुळं भारत पाक सीमेवरील वाघा बॉर्डर वर सध्या पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आलीये. या बॉर्डरवरील बोटिंग रीट्रीट बघण्यासाठी देशभरातून पर्यटक येथे भेट देत असतात. याच पर्यटकांवर सीमा भागात राहणाऱ्या अनेक नागरिकांची उपजीविका चालते (Tourists barred from entering Wagah border due to corona loss of small shopkeepers).

Wagah Border
कोरोनात छत्र हरपले..चिमुकल्यांकडे नातेवाईकांनीही फिरविली पाठ; शासनाच्या योजनेचा मिळाला आधार

मात्र, कोरोनामुळं (Corona) गेल्या दोन महिन्यांपासून पर्यटकांना याठिकाणी प्रवेशबंदी करण्यात आलीये. याचा फटका सीमाभागात राहणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना बसतोय. सध्या पंजाबमध्ये निवडणुकांमुळे (Punjab Elections) राजकीय पक्षांच्या सभा, रॅली, बैठका सुरु आहेत. या सभांमध्ये, रॅलीमध्ये नागरिकांची मोठी गर्दी असते.

'याठिकाणी कोरोना पसरत नाही आणि वाघा बोर्डरवरच कोरोना पसरतो का?' असा सवाल करत ही प्रवेश बंदी उठवावी. कोरोना नियमांचं पालन करुन पर्यटकांना प्रवेश द्यावा, अशी मागणी सीमारेषेवरील नागरिकांनी केलीये.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com