Google च्या डेटा सेंटरमध्ये शॉर्ट सर्किट, 3 कर्मचारी गंभीर जखमी

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Google Data Centre
Google Data CentreSaam Tv

Google Data Center: यूएस कौन्सिल ब्लफ्समधील गुगलच्या (Google) डेटा सेंटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाला आहे. या अपघातात ३ कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कौन्सिल ब्लफ्स पोलीस (Police) विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11:59 वाजता घडली. डेटा सेंटर इमारतींच्या जवळ असलेल्या सबस्टेशनवर तीन इलेक्ट्रिशियन काम करत असताना विद्युत स्फोट झाला, ज्यामुळे तिन्ही इलेक्ट्रिशियन गंभीर जखमी झाले आहे.

हे देखील पाहा -

यातील एका व्यक्तीला हेलिकॉप्टरने नेब्रास्का मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले, तर इतर दोघांना रुग्णवाहिकेद्वारे जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा तिघेही शुद्धीत होते.

गुगल डेटा सेंटरच्या रूपात प्रचंड ड्राईव्ह, कॉम्प्युटरचे शेल्फ, अंतर्गत आणि बाह्य नेटवर्क सुविधा, कूलिंग सिस्टीम आणि विविध प्रकारच्या सॉफ्टवेअरचा एक मोठा गुप्त परिसर दिसतो. ही डेटा सेंटर्स गुगलने जगभरात अनेक ठिकाणी तयार केली आहेत. उत्तर अमेरिकेत, बर्कले काउंटी, कौन्सिल ब्लफ्स, डग्लस काउंटी, जॅक्सन काउंटी, लेनोइर, माँटगोमेरी काउंटी, मेस काउंटी, द डॅलस, हेंडरसन आणि रेनो येथे Google केंद्र आहे.

Google Data Centre
Taapsee Pannu: 'व्यवस्थित बोला... तुम्ही माझ्यावर का ओरडत आहात', पापाराझींवर भडकली तापसी पन्नू

याशिवाय उरुग्वेच्या कोलोनिया निकोलिचमध्ये दोन, दक्षिण अमेरिकेतील चिलीमधील क्विलिकुरा आणि सेरिलोस येथे एक डेटा सेंटर आहे. बेल्जियममधील युरोपमधील सेंट गिस्लेन, फिनलंडमधील हॅमिना, आयर्लंडमधील डब्लिन, नेदरलँडमधील इमशेव्हन आणि ऍग्रीपोर्ट, डेन्मार्कमधील फ्रेडेरिशिया, स्वित्झर्लंडमधील झुरिच आणि पोलंडमधील वॉर्सा येथेही Google डेटा केंद्रे आहेत.

सिंगापूरच्या जुरोंग वेस्ट, तैवानच्या चांगहुआ काउंटी, ताइनान सिटी आणि युनलिन काउंटी आणि भारतात मुंबई येथे Google डेटा सेंटर आहे. Google चे 2.5 दशलक्ष सर्व्हर आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com