Mazagon Dock Jobs 2022 : माझगाव डॉकमध्ये विविध पदांसाठी भरती; शिकाऊ उमेदवारांना सुवर्णसंधी

majgaon dockyard recruitment 2022 Latest News | शिकाऊ उमेदवारांना अॅपरेंटीसशीप करण्यासाठी १० वी उत्तीर्ण आणि सोबत आयटीआय (ITI) उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
majgaon dockyard recruitment 2022
majgaon dockyard recruitment 2022Saam TV

मुंबई: कामाचा अनुभव घेण्यासाठी नोकरीच्या (Job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईच्या माझगाव डॉकयार्डमध्ये (Mazagon Dock, Mumbai) विविध पदांसाठी अनेक जागांसाठी भरती (vacancies) निघाली आहे. माझगाव पोस्टल शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) ने शिकाऊ उमेदवारांची भरती जाहीर केली आहे. यानुसार शिकाऊ उमेदवारांना अॅपरेंटीसशीप करण्यासाठी १० वी उत्तीर्ण आणि सोबत आयटीआय (ITI) उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. (Mazagon Dock Job)

हे देखील पाहा -

शिकाऊ कायदा 1961 अंतर्गत (Apprentices Act 1961 - Apprenticeship) इलेक्ट्रिशियन, फिटर, पाईप, स्ट्रक्चरल फिटर, ICTSM, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, वेल्डर, कंप्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट, सुतार (कापरेंटर) आणि रिंगर ट्रेड या पदांसाठी शिकाऊ उमेदवाराची भरती केली जाईल. 10 वी, 8 वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2022 आहे. तर ऑनलाइन परीक्षा 30 जुलै 2022 रोजी होणार आहे.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 जुलै 2022

पात्र उमेदवारांच्या यादीची घोषणा - 24 जुलै 2022

MDL प्रवेशपत्र - 27 जुलै 2022

MDL अपरेंटिस परीक्षेची तारीख - 30 जुलै 2022

MDL अपरेंटिस उमेदवार रिक्त जागा

अ गट (दहावी पास)

- इलेक्ट्रिशियन - 40

- फिटर - 42

-पाईप फिटर- 60

-स्ट्रक्चरल फिटर- 42

गट ब (आयटीआय पास)

- फिटर स्ट्रक्चरल (माजी ITI फिटर) - 50

-ICTSM-20

-इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 20

-पाईप फिटर - 20

-वेल्डर - 20

संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट – २०

कारपेंटर (सुतार) - 20

गट क (आठवी वर्ग)

रिगर - 2

वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) - 2

majgaon dockyard recruitment 2022
महाराष्ट्रातील 'या' बँकेवर RBI ची कारवाई; फक्त १५ हजारच काढता येणार
स्टायपेंड किती मिळेल

गट अ (दहावी उत्तीर्ण) – पहिल्या तीन महिन्यांत दरमहा रु. 3000. त्यानंतर नऊ महिन्यांसाठी दरमहा 6000. दुसऱ्या वर्षी 6600 रुपये प्रति महिना.

गट ब (आयटीआय पास) – रु.8050 प्रति महिना.

गट क (आठवी पास) – पहिल्या तीन महिन्यांसाठी दरमहा रु. 2500. यानंतर 9 महिन्यांसाठी दरमहा 5000 रु. दुसऱ्या वर्षासाठी 5500 प्रति महिना.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com