PM Modi's Mother: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हीराबेन रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

यूएन मेहता रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
PM Modi Mother
PM Modi MotherSaam TV

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांची प्रकृती खालावली आहे. सध्या त्यांना अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे. (PM Modi)

यूएन मेहता रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, यूएन मेहता रुग्णालयातनपंतप्रधान नरेंद्र मोदी येथे येणार असल्याचीही माहिती मिळत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजपचे अनेक आमदार रुग्णालयात आहेत. (Latest Marathi News)

PM Modi Mother
Maharashtra Politics : २०२४ मध्ये अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होईल; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान

पंतप्रधानांच्या आई हीराबेन 18 जून रोजी 100 वर्षांच्या झाल्या. त्यावेळी पंतप्रधान मोदी गांधीनगर येथील त्यांच्या आईच्या घरी गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आईच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त ब्लॉग देखील लिहिला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची आई हीराबेन यांच्या खूप जवळ आहेत. प्रत्येक खास प्रसंगी ते आईला भेटायला घरी जात असतात. जून महिन्यात देखील पीएम मोदी आईच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त घरी गेले होते

PM Modi Mother
Deepali Sayed : दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना जीवे मारण्याचा कट; माजी स्वीय सहाय्यकाचा गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईवर गुजरातमधील अहमदाबाद इथं उपचार सुरु आहेत. ही माहिती काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कळताच, त्यांनी मोदी यांना दिलासा देणारं ट्वीट केलं आहे. या कठीण प्रसंगी आपण मोदी सोबत असल्याचं राहुल यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, आई आणि मुलगा यांच्यातील प्रेम हे अमूल्य आहे. मोदीजी, या कठीण काळात माझे प्रेम आणि पाठिंबा तुमच्यासोबत आहे. मला आशा आहे की आई लवकर ठीक होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com