Train Accident: गुवाहटी बिकानेर एक्स्प्रेसचे 12 डबे घसरले, 9 जणांचा मृत्यू

या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ३६ लोक जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Train Accident
Train AccidentTwitter/ANI

कोलकाता - पश्चिम बंगालच्या (North Bengal) जलपाईगुडीमध्ये मैनगुडी परिसरात बिकानेर - गुवाहाटी एक्स्प्रेसचे १२ डबे रेल्वे रुळावरून घसरून मोठा अपघात (Train Accident) झाला आहे. हा भीषण अपघात गुरुवारी ( १३ जानेवारी) घडला आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ३६ लोक जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Train Accident in North Bengal)

या अपघाताची माहिती मिळताच, एनडीआरफच्या टीम सोबत मदतकार्यासाठी बीएसफचे २०० जवान घटनास्थळी दाखल झाले होते. रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी या रेल्वे अपघाताची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली असून मदतकार्यासंदर्भातील माहिती देखील दिल्याचे सांगितले. तसेच आपण मदतकार्यावर लक्ष ठेऊन असल्याचे देखील आश्विनी वैष्णव यांनी सांगितंले.

Train Accident
Latur: नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी लावला मेळ; नवीन मतदार यादीत मोठा घोळ

तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोरोना आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे अपघाताबद्दल चौकशी केली. यावेळी रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची, तर गंभीर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com