नर्सच्या हातातून निसटून नवजात बालकाचा मृत्यू; मातेला सांगितले वेगळेच कारण

रुग्णालयातील लोकांनी हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलेच्या कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे सत्य बाहेर आले.
Baby
Baby Saam Tv

उत्तर प्रदेश - लखनऊमधील चिन्हाट येथील एका खासगी रुग्णालयात (Hospital) परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाला. रुग्णालयातील लोकांनी हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलेच्या कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे सत्य बाहेर आले. याप्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे.

चिन्हाट पोलीस ठाण्याच्या एसएचओच्या म्हणण्यानुसार, १९ एप्रिल रोजी रात्री १० ते ११ च्या दरम्यान सेंटर फॉर न्यू हेल्थ रुग्णालयात एका महिलेने बाळाला जन्म दिला. मात्र नर्सने निष्काळजीपणे नवजात बाळाला टॉवेल न गुंडाळता उचलले आणि तो तिच्या हातातून घसरला आणि जमिनीवर पडला. त्यामुळे नवजात बालकाचा जागीच मृत्यू झाला.

हे देखील पाहा -

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून रिपोर्टच्या आधारे निष्काळजीपणाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चिन्हाट पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, कलम ३०४ ए (ए) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

त्या रात्री काय झाले

जीवन राजपूत यांनी १९ एप्रिल रोजी त्यांची गर्भवती पत्नी पूनम राजपूत हिला सेंटर फॉर न्यू हेल्थ रुग्णालयात दाखल केले होते. लेबर रुममध्ये आईने आरडाओरडा सुरू केला, तेव्हा लेबर रुमच्या बाहेर उभ्या असलेल्या पतीसह कुटुंबातील इतर सदस्यांनी खोलीत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र बाहेर उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले आणि धक्काबुक्की सुरू केली. कसेबसे कुटुंबीय आत शिरले, तरी पत्नीने पतीला सांगितले की, मूल निरोगी आणि सुरक्षित जन्माला आले आहे. मात्र तेथे उपस्थित परिचारिकेने त्याला एका हाताने धरले होते आणि तिच्या निष्काळजीपणामुळे बाळ हातातून खाली पडले आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

Baby
मानवाला पहिल्यांदाच बर्ड फ्लूचा संसर्ग; चीनमध्ये आढळला रुग्ण

प्रकरण लपवण्याचा प्रयत्न

त्याचवेळी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मुलाचा मृत्यू लपवण्याची खोटी कथा रचल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मुलाचा जन्म मृत झाल्याचे कुटुंबीयांना सांगण्यात आले. मात्र, कुटुंबीयांनी चिन्हाट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी नवजात बालकाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. डोक्यावर जखमेच्या खुणा आढळल्याने मुलाचा खाली पडल्याने मृत्यू झाल्याचे अहवालात उघड झाले, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com