महागाईचा आगडोंब! काडीपेटीही महागल्या...

आधीच महागाईने त्रस्त अन् त्यात फक्त 1 रुपयाला येणाऱ्या काडीपेटीची सुद्धा किंमत वाढली आहे.
महागाईचा आगडोंब! काडीपेटीही महागल्या...
महागाईचा आगडोंब! काडीपेटीही महागल्या...Saam Tv

आधीच महागाईने त्रस्त अन् त्यात फक्त 1 रुपयाला येणाऱ्या काडीपेटीची सुद्धा किंमत वाढली आहे. त्यामुळे आता पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, डाळी, भाज्यांनंतर आता काडीपेट्यांच्या किमती वाढणार आहेत. तब्बल 14 वर्षांनंतर काडीपेट्यांच्या किमती या वाढल्या आहेत. याआधी 2007 मध्ये काडीपेट्यांच्या दरात मोठी वाढ झाली होती. उद्योग प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार, कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे ही वाढ करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

वृत्तसंस्थेनुसार, 1 डिसेंबरपासून सामन्यांची किंमत एक रुपयांनी वाढणार आहे. यानंतर काडीपेट्यांची नवीन किंमत एक रुपयाने वाढवण्याचा निर्णय ऑल इंडिया चेंबर ऑफ मॅचेसच्या बैठकीत Meeting घेण्यात आला.

कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने हि भाववाढ होत आहे असे सांगण्यात येत आहे. मुख्यतः लाल फॉस्फरस, मेण, बॉक्स बोर्ड इ. या सर्व कच्च्या मालाचे भाव वाढले असून डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे वाहतूकही महाग झाली आहे.

महागाईचा आगडोंब! काडीपेटीही महागल्या...
सावकाराने महिलेला जबरदस्ती पाजले विष; परभणीतील संतापजनक घटना (पहा Video)

काडीपेट्या तयार करण्यासाठी 14 प्रकारच्या कच्च्या मालाची आवश्यकता असल्याचे उत्पादकांनी सांगितले आहे. एक किलो लाल फॉस्फरस 425 रुपयांवरून 810 रुपयांवर पोहोचले आहे. तसेच मेणाची पेटीचेही भाव वाढले आहेत. तसेच इतर कच्च्या मालांच्याही किमती वाढल्या आहेत. तसेच डिझेलच्या वाढत्या किमतींनीही या भारात भर पडली आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com