Madhya Pradesh Crime
Madhya Pradesh CrimeSaam TV

मित्राला पत्नीसोबत घरात नको त्या अवस्थेत बघितलं; त्यानंतर घडलं भयंकर...

Madhya Pradesh Crime : पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधातून पतीने मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

इंदोर : पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधातून पतीने मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राला पत्नीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यावर पतीला राग अनावर झाला आणि त्याने थेट मित्राचे डोके हातोड्याने ठेचले. मध्यप्रदेशातील इंदोर शहरात ही थरारक घटना घडली. हत्येनंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी शोध घेत त्याला अटक केली. पोलिसांसमोर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. (Madhya Pradesh Crime News)

Madhya Pradesh Crime
समलिंगी बहिणींमध्ये जडलं प्रेम; घरातून पळून लग्नही केलं, कुटुंबीयांना कळताच...

विजयनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (13 मे) ही हत्या झाली. तुकाराम बालू जाटव असे आरोपीचे नाव असून रामकृष्ण बिजोरे असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तुकाराम हा व्यवसायाने चित्रकार आहे. तर, त्याचा मृत मित्र रामकृष्ण हा फरशी बसवण्याचे काम करत होता. दोघेही एकत्र काम करायचे. काम करत असताना त्यांची मैत्री झाली. रामकृष्ण हा तुकारामच्या सोळंकी नगरातील घरी अनेकदा गेला होता.

आरोपीने तुकाराम याने पोलिसांना सांगितले की, त्याला माहित नव्हते की, त्याची पत्नी किरण आणि रामकृष्ण यांच्यात अनैतिक संबध आहे. सोबत काम करत असताना रामकृष्ण हा अनेकवेळा कोणत्या ना कोणत्या बहाण्याने कामावर येत नसायचा. शुक्रवारीही तो कामावर आला नाही. मात्र शुक्रवारी तुकाराम अचानक आपला मोबाईल घरी विसरला. मोबाईल घेण्यासाठी तो घरी आला असता, त्याच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. त्याचवेळी त्याने खिडकीतून डोकावून बघितले असता त्याला त्याची पत्नी आणि मित्र रामकृष्ण नको त्या अवस्थेत दिसले.

Madhya Pradesh Crime
होणाऱ्या पतीला व्हिडिओ कॉल केला, बोलता बोलता महिला कॉन्स्टेबलनं संपवलं जीवन

दरम्यान, आपल्या पत्नीसोबत त्याने रामकृ्ष्णला नको त्या अवस्थेत बघितल्यानंतर तुकाराम आणि त्याच्या पत्नीचे भांडण झाले. यानंतर रागाच्या भरात त्याने मित्र रामकृष्ण यांच्या डोक्यावर हातोड्याने अनेक वार केले. यामध्ये रामकृष्ण यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, तुकाराम याच्या पत्नीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी जमा झाले. त्यांनी रामकृष्णाला तातडीने रुग्णालयात दाखल केले, पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकारामने शहरातून पळून जाण्याची सर्व तयारी केली होती, मात्र त्याआधीच त्याला अटक करण्यात आली. आरोपी तुकाराम याने ज्या हातोड्याने रामकृष्ण याची हत्या केली तो हातोडा पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींकडून रक्ताने माखलेले कपडेही सापडले आहेत. हत्येनंतर तुकारामने हातोडा लपवून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com