Crime: सबसे बडा रुपैया... प्रॉपर्टीसाठी आई-वडील आणि लहान भावाचा फिल्मी स्टाईलने खून, लखनऊ हादरले

लखनऊमध्ये एका मुलाने प्रॉपर्टीसाठी आपल्याच आई-वडील आणि लहान भावाचा खून केल्याची माहिती आहे.
Crime
CrimeSaam Tv

लखनऊ : लखनऊमध्ये एका मुलाने प्रॉपर्टीसाठी आपल्याच आई-वडील आणि लहान भावाचा खून केल्याची माहिती आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​सेवानिवृत्त उपव्यवस्थापक महमूद अली खान (65), त्यांची पत्नी दरख्शा (62) आणि मुलगा शावेज (26) यांचा मोठा मुलगा सरफराज याने खून केला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण लखनऊ हादरले (Lucknow Crime News Older Son Killed Mother Father And Younger Brother For Property).

Crime
Ahmednagar Crime: 25 जणांच्या टोळक्याकडून तलवार, लोखंडी रॉडने कुटुंबावर हल्ला, दोघे गंभीर जखमी

फिल्मी स्टाईलने हत्येचा कट रचला

सरफराजने संपूर्ण फिल्मी स्टाईलमध्ये हत्ये (Murder) चा कट रचला होता. त्याने डाळीत झोपेच्या 90 गोळ्या मिसळून त्यांना खाऊ घातल्या. या हत्येत सरफराजने गुलालाघाटचा कर्मचारी अनिल यादवलाही सामिल केले होते. त्यानंतर सरफराजने अनिलसोबत मिळून तिघांचेही गळे चिरले. कटाचा एक भाग म्हणून, त्याने हत्येनंतर बहीण अनम आणि शेजाऱ्यांना सांगितले होते की ते जम्मूला फिरायला गेले होते आणि तिथल्या रामबन भागात भूस्खलनात ते बेपत्ता झाले.

इटोंजा पोलिसांनी बुधवारी आरोपी सर्फराज आणि अनिलला अटक करून या खुनाचा छडा लावला. सरफराजने इटौंजा, मलिहाबाद आणि माळ परिसरात वेगवेगळ्या वेळी तिघांचे मृतदेह फेकल्याची कबुली दिली. इटोंजा पोलिसांनी आरोपी सराफराजला विकास नगर सेक्टर 2 मधील त्याच्या घरी नेले, जेथे गच्चीवरुन रक्ताने माखलेल्या गाद्या आणि हत्या करण्यासाठी वापरलेले शस्त्र जप्त आले. गळा चिरून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचेही सरफराजने कबुल केले.

प्रेमविवाह केल्याने कुटुंब नाराज

या खुनासाठी अनिलने पाच लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, नंतर एक लाख 80 हजारात ठरलं. सरफराजने दिलेल्या माहितीनुसार, त्याने प्रेमविवाह (Love Marriage) केला होता, त्यामुळे त्याचे कुटुंबीय त्याचावर नाराज होते. त्याला संपत्तीतून बाहेर काढण्याचं त्यांनी ठरवलं होतं. तर, संपूर्ण कुटुंब लहान भाऊ शावेजच्या अधिक जवळचे झाले होते. त्यांना शावेजला कोट्यवधींची संपत्ती द्यायची होती. त्यामुळे सरफराजने हे पाऊल उचलले.

एएसपी ग्रामीण हृदयेश कठेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरफराजची वागणूक चांगली नव्हती. त्यामुळे घरचे त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचे. सरफराजने पाच वर्षांपूर्वी आई-वडिलांच्या संमतीशिवाय लग्न केल्याचे कळताच महमूद आणि दरख्क्षा यांना खूप राग आला होता. त्यांनी सरफराजशी नाते तोडण्याचा विचार केला होता. यानंतर सरफराजचे घरी येणेही कमी झाले होते. तो कोलकात्याला गेला होता. मात्र, नोव्हेंबरमध्ये बहीण अनमच्या लग्नाच्या बहाण्याने सरफराज पुन्हा घरी परतला. या काळातही कुटुंबियांच्या त्याच्याशी असलेल्या वागणुकीत बदल झाला नव्हता.

धाकट्या भावाला संपत्ती मिळण्याची भीती

सीओ नबीना शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरफराजला भीती होती की त्याचे वडील आपल्या धाकट्या भावाला संपूर्ण संपत्ती देतील. त्यात 3 कोटी रुपये किंमतीच्या विकासनगर येथील घराचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत सरफराजने कुटुंबाला संपवण्याचा निर्णय घेतला, असं सरफराजने कबुल केले.

क्रुरतेच्या सर्व सीमा पार

4 जानेवारीला सरफराजने आई, वडील आणि भावाला मारण्यासाठी डाळीत तब्बल 90 झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या. दाळ खाल्ल्यानंतर तिघेही बेशुद्ध पडले. त्यानंतर सरफराजने त्यांचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ते करु शकला नाही. त्यानंतर त्याने रात्री उशिरा अनिलला घरी बोलावले. एका वारमध्ये गळा कापला गेला नाही, त्यामुळे अनिलने त्यांच्यावर अनेकदा वार केले आणि अत्यंत निर्दयीपणे तिघांनी हत्या करण्यात आली.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com