Snake News: बापरे! मुलाने किंगकोब्राचे तोडले लचके; सापाचा जागीच मृत्यू

Bite of king cobra: माणूस चावल्याने सापचा मृत्यू झाल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का?
Sanke News
Sanke NewsSaam TV

Chhattisgarh News: साप असं नाव ऐकलं तरी भल्याभल्यांना घाम फुटतो. सर्पदंश झाल्यावर सापाच्या विषापेक्षा माणूस साप चावला या भीतीनेच घाबरून जातो. साप चावल्याने आजवर अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशात माणूस चावल्याने सापचा मृत्यू झाल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? (Latest king cobra News)

साप हा सर्वाधिक विषारी प्राणी. त्यातही किंग कोब्रा म्हणजे वरचं तिकीट पक्कच समजा. छत्तीसगडमध्ये साप चावल्याची एक विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेत साप अचानक एका आठवर्षीय मुलासमोर आला. साप पाहून मुलगा प्रचंड घाबरला. काय करावे त्याला सुचेना.

Sanke News
Pre Wedding Photoshoot With Kingcobra: आता तर हद्दच झाली! कपलने चक्क नागासोबत केलं प्री-वेडिंग शूट; फोटो होतायत Viral

साप समोर दिसला की कोणतीही हालचाल न करता शांत उभे राहिल्यास साप आपल्याला दंश करत नाही. त्यामुळे हा मुलगा देखील आपला जीव वाचवण्यासाठी तेथे शांत उभा राहिला. मात्र किंग कोब्रा साप थेट मुलाच्या हातावर चढला.

साप हातावर चढल्यावर मुलाला फार भीती वाटली. किंग कोब्रा साप चावल्यावर माणसाची वाचण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे मुलाने थेट किंग कोब्रा सापाचा चावा घेतला. चावा घेताच साप खाली पडला. दिपक असं ८ वर्षीय मुलाचं नाव आहे. चावा घेतल्यावर सापाचा यात मृत्यू झाला आहे.

Sanke News
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: रात्री अंगणात झोपताना सावधान! आईच्या कुशीतून पळवलं बाळ

सदर घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडालीये. दिपकच्या आई बाबांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्याला विष उतरवण्याचे औषध देण्यात आले. मात्र दिपकला सापाचे विष चढले नव्हते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com