J&K Terrorist Attack: पुंछमध्ये लष्कराच्या वाहनांवर दहशतवादी हल्ला, जवानांकडून चोख प्रत्युत्तर

J&K Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनांवर गोळीबार केला असून लष्कराच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. या हल्ल्यात लष्कराचं कोणतंही नुकसान झाल्याचं वृत्त नाही.
J&K Terrorist Attack
J&K Terrorist AttackSaam Digital

J&K Terrorist Attack

जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनांवर गोळीबार केला असून लष्कराच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. या हल्ल्यात लष्कराचं कोणतंही नुकसान झाल्याचं वृत्त नाही. गेल्या तीन आठवड्यांत याच भागात लष्करावर झालेला हा दुसरा हल्ला आहे. चकमक अद्याप सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

मागच्या तीन आठवड्यांत या भागात लष्करावर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. यापूर्वी राजौरीतील डेरा गल्लीत दोन लष्करी वाहनांवर हल्ला झाला होता. यात चार जवान शहीद झाले होते, तर पाच जण जखमी झाले होते. आज सायंकाळी ज्या ठिकाणी हल्ला झाला ते ठिकाण आधीच्या हल्ल्याच्या ठिकाणापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

J&K Terrorist Attack
Japan Sea Moved Back: बापरे! जपानमधील भूकंपानंतर चक्क समुद्र सरकला ८२० फूट मागे

2003 पासून पीर पंजाल प्रदेश (राजौरी आणि पूंछ) दहशतवादापासून मुक्त होता परंतु ऑक्टोबर 2021 पासून या भागात पुन्हा मोठे हल्ले सुरू झाले आहेत. गेल्या सात महिन्यांत अधिकारी आणि कमांडोसह 20 जवान शहीद झाले आहेत.

J&K Terrorist Attack
Boycott Effect On Maldives Tourism: भारतीयांच्या बहिष्काराचा परिणाम, मालदीवला दररोज इतक्या कोटींचा तोटा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com