'मी हार मानली नाही', भाजी विक्रेत्याची मुलगी बनली न्यायाधीश

तिचे वडील अशोक नगर हे शहरातील मुसाखेडी परिसरात भाजी विकतात, तर आई लक्ष्मी इतरांच्या घरी जेवण बनवते.
Success Story in Marathi, motivational story in marathi, Inspirational Stories in Marathi
Success Story in Marathi, motivational story in marathi, Inspirational Stories in MarathiTwitter

मध्य प्रदेश येथे भाजी विकून आपले घर चालवणाऱ्या एका कुटुंबातील २९ वर्षीय मुलीची दिवाणी न्यायाधीश वर्ग-२ या पदासाठी निवड झाली आहे. इंदूरच्या मुसाखेडी येथील सीताराम पार्क कॉलनीत अंकिता नागर राहते. तिचे वडील अशोक नगर हे शहरातील मुसाखेडी परिसरात भाजी विकतात, तर आई लक्ष्मी इतरांच्या घरी जेवण बनवते. (Success Story in Marathi)

न्यायाधीश भरती परीक्षेत तीनदा नापास होऊनही तिची नजर लक्ष्यावरच राहिली. संघर्षाच्या काळातून जात असलेल्या या कुटुंबातील मुलगी अंकितासाठी न्यायाधीश बनणे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हते, पण आपण न्यायाधीश होणारच असा निर्धार तिने केला होता आणि अखेर चौथ्या प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश बनली आहे.

अंकिताने इंदूरमधून एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने दिवाणी न्यायाधीश होण्याची तयारी सुरू केली. न्यायाधीशांच्या भरती परीक्षेत तीनदा अपयशी झाल्यानंतरही मी धीर सोडला नाही आणि माझे ध्येय साध्य करण्यासाठी तयारी करत राहिली. या संघर्षादरम्यान माझ्यासाठी मार्ग मोकळे झाले आणि मी त्यांचा पाठपुरावा करत राहिलो असे अंकिताने सांगितले.

न्यायाधीशांच्या भरती परीक्षेत आपल्या मुलीच्या यशाने आश्चर्यचकित झालेल्या भाजी विक्रेते अशोक नगर यांनी सांगितले की, जीवनातील खडतर संघर्षानंतरही तिने हार मानली नाही म्हणून त्यांची मुलगी जगासमोर एक उदाहरण आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, अशा परिस्थितीत अंकिताच्या अभ्यासासाठी अनेकदा पैसे उसने घ्यावे लागले पण तिचा अभ्यास थांबू दिला नाही.

Success Story in Marathi, motivational story in marathi, Inspirational Stories in Marathi
भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, एक जण गंभीर

अंकिता रोज ८ तास अभ्यास करायची त्यासोबतच ती आपल्या वडिलांना देखील त्यांच्या कामात मदत करायची. गेल्या तीन वर्षांपासून अंकिता दिवाणी न्यायाधीशपदाची तयारी करत होती. आणि अखेर तिच्या या प्रयत्नांना यश आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com