नवी दिल्ली : देशात कोरोना (Corona) व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. दिवसागणिक मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण (corona new patients) आढळून येत आहे. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून 15 हजारांच्या घरात आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येनं आता 20 हजारांचा टप्पा पार केला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 20 हजार 139 नवे रुग्ण आढळून आले असून 38 जणांचा मृत्युही झाला आहे. (Corona Cases In India)
बुधवारी देशात 16 हजार 906 रुग्णांची नोंद आणि 45 रुग्णांचा मृत्यू झाला होता. बुधवारच्या तुलनेत देशातील मृत्यूंची संख्या घटली असली तरी, कोरोना रुग्णांच्या संख्येत 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांची ही नवीन आकडेवारी जारी केली आहे. दरम्यान, नवीन आढळून आलेल्या रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 43, 689,989 वर पोहचली आहे.
आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 482 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी दिवसभरात 38 जणांचा मृत्यू झाला. यासह कोरोनामुळे एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या 5 लाख 25 हजार 557 वर पोहोचली आहे.
सध्या भारतात कोरोनाचे 1 लाख 36 हजार 76 सक्रिय रुग्ण आहेत. सध्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.31 टक्के आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.49 टक्के आहे. आतापर्यंत देशात एकूण 4 कोटी 30 लाख 28 हजार 356 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. (Covid 19 India)
सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात
देशात आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहे. बुधवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 2 हजार 575 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे यादरम्यान, 3 हजार 210 जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, राज्यात सध्या 16 हजार 922 रुग्ण उपचाराधीन आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.84 टक्के एवढा आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.