Uttar Pradesh: अरेच्चा! ढोलताशांच्या गजरात चक्क नवरीची निघाली वरात; वडील म्हणाले माला पश्चाताप...

उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जनपदमध्ये ही अनोखी वरात पाहायला मिळाली.
Uttar Pradesh
Uttar PradeshSaam TV

Uttar Pradesh: लग्न समारंभ म्हटल्यावर नवरीच्या घरी वेगळीच मजा असते. मेहंदी, हळदी, संगीत असे विधी पार पाडले जातात. अशात नवरदेवाकडे वरातीत मोठी धमाल केली जाते. नवरदेवाची वरात तुम्ही सर्वांनी पाहिलीच असेल. मात्र उत्तर प्रदेशमध्ये एका नवरीची वाजत गाजत वरात निघाली आहे. नवरीची वरात पाहून रस्त्यावर सगळेच थक्क झालेत. नवरीच्या वरातीचा व्हिडिओ देखील काहींनी आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मुरादाबाद जनपदमध्ये ही अनोखी वरात पाहायला मिळाली. लग्नाच्या एक दिवस आधी मुलीच्या वडिलांनी तिच्यासाठी सुंदर रथ सजवला या रथावर विराजमान होत मुलीची वरात काढली. मुलांप्रमाणेच मुलींना देखील समान अधिकार मिळायला हवेत. असे मुलिच्या वडिलांचे म्हणने आहे. त्यांनी आपल्या मुलीला अगदी मुलाप्रमाणे फेटा देखील बांधला होता. नवरीचा अनोखा थाट नेटकऱ्यांना देखील भावला आहे.

Uttar Pradesh
Uttar Pradesh News : उंदराला मारल्याने उत्तरप्रदेशात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल; उंदराचं पोस्टमार्टम करण्याचे आदेश

राजेश शर्मा यांनी आपल्या मुलीसाठी ही वरात काढली आहे. शर्मा कुटुंबीय हिमगिरि कॉलिनीचे रहिवासी आहेत. त्यांच्या मुलीचे म्हणजेच नवरीचे नाव श्वेता शर्मा असे आहे. ढोलताशांच्या मोठ्या गाजावाजात ही वरात काढण्यात आली. यावेळी श्वेता देखील रथामध्ये बसून गाण्यांच्या तालावर थिरकताना दिसली. ६ डिसेंबर रोजी ही वरात निघाली होती.

Uttar Pradesh
Uttar Pradesh News: गावात कोणी पोरगी देईना, सुखी संसारही झाले उद्ध्वस्त; माशांच्या त्रासाने गाव मेटाकुटीला

२७ वर्षांआधी वडिलांना झाला होता पश्चाताप

श्वेता नवरदेवाच्या वेशात देखील खुप सुंदर दिसत होती. वरात देवळात (Temple) पोहचल्यावर तिने देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर वडिलांनी २७ वर्षां आधीची एक आठवण सांगितली. ते म्हणाले की, २७ वर्षां आधी मुलगी झाली म्हणून माला पश्चाताप झाला होता. मात्र आता माझ्या मुलीसाठी मी खुप खूष आहे, असे ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com