International News: होंडुरासमध्ये 20 पर्यटकांसह जहाज बुडालं, बचाव कार्य सुरू

Honduras Shocker: होंडुरासमध्ये 20 पर्यटकांसह जहाज बुडालं
Honduras Shocker
Honduras ShockerSaamTv

World News Today : होंडुरासमध्ये 20 पर्यटकांना घेऊन जाणारे जहाज बुडाल्याची बातमी समोर आली आहे. सीएनएनने शनिवारी होंडुरास अग्निशमन विभागाचा हवाला देत हे वृत्त दिलं आहे. अग्निशमन विभागाने सांगितले की, ही घटना होंडुरासमधील सॅन लोरेन्झो भागातील प्लाया ला काबाना येथे घडली.

या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाल्याची पुष्टी झालेली नाही. शोध आणि बचाव कार्य सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेबाबत अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही. (Latest Marathi News)

Honduras Shocker
Mumbai Latest News : मुंबईवर पुन्हा अतिरेक्यांची नजर, तीन अतिरेकी घुसल्याची पोलिसांना फोनवरून माहिती

युक्रेनकडे जाणारे मालवाहू जहाज भूमध्य सागरी किनाऱ्यावर बुडाले, 3 जणांचा मृत्यू

दरम्यान, मागील महिन्यात गिनी-बिसाऊ येथून युक्रेनकडे निघालेले एक व्यापारी जहाज तुर्कस्तानच्या भूमध्य सागरी किनाऱ्यावर बुडाले. या अपघातात जहाजावरील तीन जणांचा मृत्यू झाला होता.

Honduras Shocker
POCO C51 Launched: 5000Mah बॅटरी आणि 7GB पर्यंत RAM सपोर्टसह Poco C51 लॉन्च, किंमत फक्त 9,999 रुपये

अंटाल्या प्रांतातील कुमलुका जिल्ह्यात बुडालेल्या "जो 2" या जहाजावरील सर्व 14 क्रू मेंबर्स हे सीरियन नागरिक होते आणि ते तुर्कीच्या दक्षिणी हाते. प्रांतातील इस्केंडरुन बंदरातून युक्रेनच्या इस्माईल बंदरात अॅल्युमिनियमची वाहतूक करत होते. त्यावेळी ही घटना घडली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com