भारत लसीकरणातही अब्जधीश; ओलांडला 100 कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा

कोरोना विषाणूच्या साथीच्या लढाई युद्धात भारताने आज एक मोठा विक्रम केला आहे. भारतातील लसीकरणाचा आकडा आज 100 कोटींच्या पुढे गेला आहे.
भारत लसीकरणातही अब्जधीश; ओलांडला 100 कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा
भारत लसीकरणातही अब्जधीश; ओलांडला 100 कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पाSaam Tv

कोरोना विषाणूच्या साथीच्या Corona Wave India लढाई युद्धात भारताने आज एक मोठा विक्रम केला आहे. भारतासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण आज भारताने इतिहास रचला आहे. भारतातील लसीकरणाचा Vaccination India आकडा आज 100 कोटींच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत जगात फक्त चीनने 100 कोटींहून अधिक लसीकरण केले आहे. परंतु 100 कोटी लसीकरणाचा आकडा पार केलेल्या चीननंतर भारत असा पराक्रम करणारा दुसरा देश बनला आहे.

भारतात आतापर्यंत, 18 वर्षांवरील 75 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 31 टक्क्यांहून अधिक लोकांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे.

75% प्रौढांचे लसीकरण;

विशेष म्हणजे 75% सर्व प्रौढांना लसीचा पहिला डोस First Dose Of Corona Vaccine देण्यात आला आहे. 100 कोटी डोसचे लक्ष्य पूर्ण केल्याबद्दल देशामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन आज करण्यात आले आहे.

आज देशभरात विविध कार्यक्रम;

देशभरात 100 स्मारके तिरंग्याने प्रकाशित करण्याची देखील योजना आहे. आज लाल किल्ल्यावर 225 फूट लांब तिरंगा Indian Flag फडकवला जाईल. त्याचे वजन सुमारे 1400 किलो आहे. गायक कैलाश खेर यांचे गाणे आणि दृकश्राव्य (Audio Visual) चित्रपट मनसुख मांडवीया रिलीज करणार आहेत. आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी कोरोना लढाईविरुद्ध अत्यंत महत्वाचा आणि मोठा आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com