
उत्तर प्रदेशातील आग्रा (Agra) येथील ताजमहालामधील 22 बंद खोल्या उघडण्याच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (allahabad highcourt) लखनौ खंडपीठात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आज याचिकाकर्त्यांना काही प्रश्न विचारले आणि न्यायालयाने म्हटले की, तुमच्या कोणत्या अधिकारांचे उल्लंघन झाले आहे?. तुम्हाला आमच्याकडून काय हवे आहे. आज याचिकाकर्त्यांच्या याचिकेवर कडक भाष्य करताना न्यायालयाने ताजमहाल कोणी बांधला, संशोधन करा, विद्यापीठात जाऊन पीएचडी करा आणि कोणी नकार दिला तर न्यायालयात या, असे म्हटले आहे. जनहित याचिका प्रणालीची खिल्ली उडवू नये, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे. दुपारी 2.15 वाजता न्यायालय या प्रकरणी निकाल देणार आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत म्हटले होते की ताजमहालमधील 22 बंद खोल्या उघडण्यात याव्यात जेणेकरून लोकांना या 22 बंद खोल्यांमध्ये काय आहे हे कळू शकेल. याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत आरटीआय दाखल करून या 22 खोल्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला आणि त्या का बंद केल्या आहेत, असा युक्तिवाद केला आहे. मात्र या उत्तराने याचिकाकर्त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने आज याचिकाकर्त्यांना आग्रा येथील ताजमहालच्या 22 खोल्या उघडण्यासंदर्भात प्रश्न विचारले आणि न्यायालयाने सांगितले की तुमच्या कोणत्याही अधिकारांचे उल्लंघन झाले आहे? तुम्हाला आमच्याकडून काय हवे आहे, असेही न्यायालयाने सुनावले. या प्रकरणावर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने याचिकाकर्त्याला जनहित याचिकेच्या व्यवस्थेचा गैरवापर करू नये असेही खडसावले आहे. याप्रकरणी आज सुनावणी करताना न्यायालयाने याचिकाकर्त्याला विद्यापीठात प्रवेश घेवून अभ्सास करण्यासा सांगितले आहे, जर एखाद्या विद्यापीठाने तुम्हाला अशा विषयावर संशोधन करण्यास मनाई केली असेल तर आमच्याकडे या असे न्यायालय म्हटले आहे.
भाजप नेत्याने केली होती याचिका दाखल
याचिकाकर्ते, अयोध्येतील भारतीय जनता पक्षाचे नेते रजनीश सिंह यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना या खोल्यांबद्दल माहिती अधिकारातून माहिती मिळवायची होती तेव्हा त्यांना सांगण्यात आले की सुरक्षेच्या कारणास्तव 22 खोल्या बंद करण्यात आल्या आहेत. 22 बंद खोल्यांमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती आहेत, असे इतिहासकार आणि हिंदू संघटना सांगत असतात आणि जर असे असेल तर सत्य सर्वांसमोर आले पाहिजे, असेही याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. जेणेकरून सत्य सर्वांसमोर येईल. सध्या या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप खासदार म्हणाले - ताजमहाल आमच्या जमिनीवर बांधला
राजस्थानमधील भाजप खासदार दिया कुमारी यांनीही ताजमहाल प्रकरणी नवे वक्तव्य केले असून ताजमहाल हा आमच्या जमिनीवर बांधल्याचे म्हटले आहे. खरं तर, ताजमहालच्या 22 बंद खोल्यांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे विधानही महत्त्वाचे मानले जात आहे. खासदार दिया कुमारी म्हणाल्या की, ताजमहालची जमीन आमच्या वंशजांची होती आणि ताजमहाल हा प्रत्यक्षात तेजो महल पॅलेस होता जो शाहजहानच्या ताब्यात होता.
Edited By: Pravin Dhamale
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.