'हॅरी पॉटर' ठरलं 20 व्या शतकातील सर्वात महागडं पुस्तक, 3 कोटी 56 लाखांना विक्री

हॅरी पॉटरची (Harry Potter) कथा सांगणाऱ्या पुस्तकाची आवृत्ती लहान मुलांमध्ये, तसेच प्रौढांमध्येही अतिशय लोकप्रिय आहे.
'हॅरी पॉटर' ठरलं 20 व्या शतकातील सर्वात महागडं पुस्तक
'हॅरी पॉटर' ठरलं 20 व्या शतकातील सर्वात महागडं पुस्तकSaam Tv

मुंबई : जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला आश्चर्यचकित करतात. तर, कधीकधी या आश्चर्यचकित (Surprising Things) करणाऱ्या गोष्टी अनेक रेकॉर्डही तोडतात. अशीच एक बातमी सध्या चर्चेत आहे. तुमच्या मते एखाद्या पुस्तकाची किंमत किती असू शकते? (Most Expensive 20th Century Book) अगदी कितीही प्रसिद्ध पुस्तकासाठी देखील काही हजार रुपयेच खर्च करावे लागतात. पण, हॅरी पॉटरची (Harry Potter) कथा सांगणाऱ्या पुस्तकाची आवृत्ती, जी लहान मुलांमध्ये, तसेच प्रौढांमध्येही अतिशय लोकप्रिय आहे, ती तब्बल 471,000 डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 3 कोटी 56 लाख 62 हजार 942.50 रुपयांमध्ये विकली गेली आहे. हे 20 व्या शतकातील सर्वात महागडे पुस्तक ठरले आहे.

हॅरी पॉटरची पहिली आवृत्ती अमेरिकेत लिलावासाठी ठेवण्यात आली होती. त्यानंतर जेव्हा त्याची किंमत 3 कोटी 50 लाखांच्या पुढे गेली तेव्हा एक वेगळा रेकॉर्डच तयार झाला. हे विसाव्या शतकातील सर्वात महागडे विकले जाणारे काल्पनिक पुस्तक ठरले आहे. त्याची पहिली आवृत्ती 1997 मध्ये प्रकाशित झाली होती आणि ती हार्ड कवर की बाइंडिंग होती. या ब्रिटीश आवृत्तीचे नाव "हॅरी पॉटर आणि फिलॉसॉफर्स स्टोन" (Harry Potter and the Sorcerer’s Stone) असे आहे.

'हॅरी पॉटर' ठरलं 20 व्या शतकातील सर्वात महागडं पुस्तक
माणसातला देव, विजेच्या तारेवर अडकलेल्या पक्ष्याला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरने पोहोचला देवदूत

विक्रमी किमतीत विकले गेले पुस्तक

कोट्यावधींना विकल्या गेलेल्या या पुस्तकाला हेरिटेज ऑक्शन्सने जादुई असे वर्णन केले आहे. हे ब्रिटीश आवृत्तीचे हे पुस्तक अमेरिकेत "हॅरी पॉटर अँड द सॉर्सरर्स स्टोन" (Harry Potter and the Sorcerer’s Stone) या नावाने प्रकाशित झाले होते. यापूर्वी, जेव्हा पहिली आवृत्ती लिलावासाठी ठेवण्यात आली होती, तेव्हा त्याची किंमत 1.1 ते 1.4 कोटींपर्यंत गेली होती. हे पुस्तक अमेरिकेतील एका कलेक्टरने विकले आहे, तर ते विकत घेतलेल्या व्यक्तीचे नाव उघड करण्यात आलेले नाही.

जगभरात लाखो पुस्तकांची विक्री

हॅरी पॉटरची कथा ब्रिटीश लेखिका जे.के. रोलिंग यांनी लिहिली आहे. याशिवाय, पुस्तकाच्या आणखी 6 आवृत्त्या लिहिल्या गेल्या आहेत. जगभरात या पुस्तकाच्या 500 दशलक्ष प्रती विकल्या गेल्या आहेत. त्याचे 80 भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. या पुस्तकावर आधारित आठ चित्रपटही बनवण्यात आले आङेत. ज्यांनी जागतिक बॉक्स ऑफिसवर अब्जावधींची कमाई केलीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com