कबर खोदणारा रातोरात बनला करोडपती; अंदाजे लावलेला आकडा ठरला फायदेशीर; आकडा निवडण्यामागेही कारण...

क्विक पिकमध्ये संगणक आपोआप लॉटरी प्लेअरसाठी नंबर निवडतो.
Dollar
Dollar Saam TV

वॉशिंग्टन : कुणाचं नशीब कुठे आणि कधी उघडेल सांगता येत नाही. याचंच एक उत्तम उदाहरण समोर आलं आहे. कबर खोदणाऱ्या एका गरीब व्यक्तीला सुमारे दोन कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. विशेष म्हणजे या व्यक्ती पहिल्यांदाच लॉटरी काढली होती. लॉटरी जिंकलेल्या भाग्यवान विजेत्याचे नाव ल्यूथर डाउडी असून ते 63 वर्षांचे आहेत.

ल्यूथर प्रसिद्ध अमेरिकन प्रोफेशनल ड्रायव्हर डेल अर्नहार्टचे चाहते आहेत. त्यांनी कम्पुटरराईज्ड आपोआप निवडलेल्या '3' क्रमांकावर पैज लावली. कारण डेलच्या रेसिंग कारचा क्रमांक '3' होता.  (Maharashtra News)

Dollar
Gopichand Padalkar on NCP : येत्या काळात जयंत पाटलांच्या घरावर भाजपचा झेंडा लागलेला असेल, गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

त्यांनी अंदाजे लावलेला आकडा एवढा परफेक्ट बसला की ते करोडपती झाले. ल्यूथर यांनी म्हटलं की, मी डेलचा चाहता आहे. कबर खोदणारा ल्यूथर लिंकनटन, नॉर्थ कॅरोलिना येथे राहतो. नॉर्थ कॅरोलिना एज्युकेशन लॉटरीशी बोलताना सांगितलं की, त्यांनी पहिल्यांदाच कॅश 5 ड्रॉइंगमध्ये नशीब आजमावलं होतं. क्विक पिकमध्ये संगणक आपोआप लॉटरी प्लेअरसाठी नंबर निवडतो.

Dollar
5G Service : मुंबई, दिल्ली, कोलकातानंतर या शहरांमध्ये Jio 5G सेवा सुरु, वेलकम ऑफरमध्ये फ्री मिळेल अनलिमिडेट डेटा

ल्युथरने स्पष्ट केले की, तीन क्रमांकाची निवड केली कारण डेल अर्नहार्टच्या रेसिंग कारमध्ये देखील क्रमांक 3 असायचा. दुसऱ्या दिवशी लॉटरीचे आकडे तपासले असता त्याने 2 कोटींची रक्कम जिंकल्याचे दिसून आले. आधी त्याला विश्वास बसत नव्हता की त्याने एवढी मोठी रक्कम जिंकली आहे. जिंकलेल्या रकमेतून ल्युथर त्यांचा कर्ज फेडणार आहेत. त्याचबरोबर गरजू शेजाऱ्यांनाही मदत करणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com