स्मृती इराणींची मुलगी गोव्यात बार चालवते का ? हायकोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी

गेल्या काही दिवसांपासून गोवा रेस्टॉरंट बार वरुन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर आरोप सुरू आहेत.
Smriti Irani
Smriti IraniSaam Tv

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री आणि भाजप (BJP) नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या मुलीच्या कथित रेस्टॉरंटचा वाद चांगलाच गाजला आहे. काँग्रेसने स्मृती इराणी यांची मुलगी झोएश इराणी या गोवा (Goa) येथे रेस्टॉरंट व बार चालवत आहेत, आरोप काँग्रेसने केला आहे. गोव्यातील रेस्टॉरंटच्या वादाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांची मुलगी त्या रेस्टॉरंटच्या मालक नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Smriti Irani
मराठी कविता ऐकवत सुप्रिया सुळेंचा महागाईवरुन हल्लाबोल; सगळ्यांनीच ऐकावं असं तुफान भाषण

तसेच त्या रेस्टॉरंटच्या संबंधात त्यांनी कधीही परवान्यासाठी अर्ज केलेला नाही. या प्रकरणाची शुक्रवारी (२९ जुलै) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावर सुनावणी आज हायकोर्टात झाली, न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. काँग्रेस नेते जयराम रमेश, पवन खेडा, आणि नेट्टा डिसूझा यांना समन्स पाठवले आहे. स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यावर हे समन्स पाठवण्यात आले आहे.

इराणी (Smriti Irani) यांनी या नेत्यांना २ कोटींची मानहानीची नोटीस पाठवली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने काँग्रेस नेते पवन खेरा यांनी स्मृती इराणी यांच्या मुलीशी संबंधित ट्विट तात्काळ डिलीट करण्याचे आदेश दिले होते. रेस्टॉरंट किंवा जमीन स्मृती इराणींच्या मालकीचे नाही, असंही हायकोर्ट म्हणाले.

Smriti Irani
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार - एकनाथ शिंदे

गोव्यातील रेस्टॉरंट किंवा ती जमीन स्मृती इराणी किंवा त्यांच्या मुलीची नाही, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. तीन खोट्या गोष्टी पसरवल्या. यासोबतच त्यांनी स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीवर वैयक्तिक आरोप केले. असे करून स्मृती इराणी यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम केल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. वास्तविक तथ्य जाणून न घेता आरोप केले, ज्यामुळे स्मृती इराणी आणि त्यांच्या कुटुंबाची प्रतिमा खराब झाली, असंही न्यायायाने म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com