हा भाजप आहे, घराणेशाही, वंशवादाच्या चिखलात कमळ फुलवलं; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंशवाद आणि घराणेशाहीच्या मुद्द्यावरून विरोधकांवर हल्लाबोल केला.
PM Narendra Modi in BJP national office bearers meeting (ANI)
PM Narendra Modi in BJP national office bearers meeting (ANI)SAAM TV

जयपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान येथील जयपूरमध्ये भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थितांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यावेळी मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. स्वातंत्र्यानंतरच घराणेशाहीच्या राजकारणानं देशाचं भयंकर नुकसान केलं आहे. वंशवादी पक्षांनी देशात भ्रष्टाचार, अफरातफरी आणि भाव-भावकीतल्या वादांचा आधार घेऊन देशाचा मौल्यवान वेळ वाया घालवला आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी विरोधकांवर तोफ डागली. (PM Narendra Modi in BJP national office bearers meeting in Jaipur)

PM Narendra Modi in BJP national office bearers meeting (ANI)
Devendra Fadnavis on Modi | आता या देशात एकच वाघ तो म्हणजे.. नरेंद्र मोदी : देवेंद्र फडणवीस

भारताकडे हे जग मोठ्या अपेक्षेने बघत आहे. तशाच प्रकारे भारतात भाजपबद्दल जनतेचे विशेष असे प्रेम आहे. देशातील जनता ही भाजपकडे मोठ्या विश्वासाने आणि अपेक्षेने बघत आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'जनसंघापासून आमचा प्रवास सुरू झाला आणि भाजपच्या रुपानं तो अधिक विस्तारला. पक्षाचे हे रूप आणि विस्तार बघितल्यानंतर अभिमान वाटतो. पक्षाच्या उभारणीसाठी स्वतःला झोकून देणाऱ्या पक्षाच्या सर्व दिग्गजांना मी नमन करतो.' हा भाजप आहे. साचलेपण नाही. गतीमान आहे. वंशवाद आणि घराणेशाहीच्या चिखलात कमळ फुलवले आहे. जेव्हा जेव्हा गरज भासली, तेव्हा आम्ही देशहीत लक्षात घेऊन आधुनिकतेची कास धरली, असंही मोदी म्हणाले.

PM Narendra Modi in BJP national office bearers meeting (ANI)
मोदी सरकारवर सोनियांचा हल्लाबोल; म्हणाल्या, भाजपनं लोकांना भीतीच्या छायेखाली...

भाजपसाठी हीच योग्य वेळ- मोदी

देशातील जनतेची हीच आशा-अपेक्षा आमच्यावरील जबाबदारी आणखी वाढवत आहे. स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात देश आपल्यासाठी पुढील २५ वर्षांचे लक्ष्य निश्चित करत आहे. पुढील २५ वर्षांचे लक्ष्य गाठण्याचे आणि न थांबता काम करण्याची भाजपसाठी (BJP) हीच योग्य वेळ आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले. आपल्या देशानं मोठे लक्ष्य समोर ठेवले आहे आणि त्यावर काम सुरू आहे. ही बाब आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे. भाजप कार्यकर्ता म्हणून आपल्याला निवांत बसण्याचा हक्क आणि अधिकार नाही. भारताला यशोशिखरावर पोहोचवण्याचे लक्ष्य आहे, जे देशाच्या स्वातंत्र्यांसाठी बलिदान देणाऱ्यांनी बघितलं होतं आणि त्यासाठीच आम्ही आतुर आहोत, असंही मोदी म्हणाले. विरोधकांवरही त्यांनी निशाणा साधला. काही पक्ष पूर्ण ताकदीने देशातील मुख्य मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष हटवण्याचे काम करत आहेत. अशा पक्षांच्या जाळ्यात आपल्याला अडकायचे नाही, असा सल्ला त्यांनी पक्षाच्या नेत्यांना दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com