Video : बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणी भिडल्या; एकमेकींची लाथा-बुक्क्यांनी धुलाई

व्हायरल झालेल्या व्हिडिओत दोन तरुणी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहे.
 Girls Fight Video
Girls Fight VideoSaam TV

रायपूर : मुलींसोबत असलेल्या प्रेमप्रकरणातून मुलांमध्ये राडा झाल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, पण कधी बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये राडा झाल्याचे प्रकरण तुम्ही ऐकलं आहे का? छत्तीसगडच्या (Chhattisgarh) रायपूरमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील दोन तरुणींमध्ये चक्क बॉयफ्रेंडसाठी हाणामारी (Girls Fight) झाली आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral Video) प्रचंड व्हायरल झाला आहे. (Girls Fight Viral Video)

 Girls Fight Video
भयंकर! तरुणीला पटवण्यासाठी त्यानं चक्क जीवलग मित्राला संपवलं

व्हायरल झालेल्या व्हिडिओत दोन तरुणी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहे. माहितीनुसार हा व्हिडिओ रायपूरच्या सुभाष स्टेडियम परिसरातील आहे. दोन्ही मुली स्टेडियमच्या जिममध्ये ट्रेनर असल्याचं सांगण्यात येत आहे. एक तरुणी दुसऱ्या तरुणीच्या बॉयफ्रेंडसोबत बोलत असल्याने हा वाद झाला आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही मुली एकमेकांचे केस ओढत आहेत आणि मारहाण करत आहेत. दोघांच्या तोंडून अखंड शिव्याही निघत आहेत.

बॉयफ्रेंडमुळे वाद!

तरुणींमधील हा हायव्होल्टेज ड्रामा सुमारे तासभर चालला. स्टेडियममध्ये खेळणाऱ्या मुलांनीही हा ड्रामा बघितला. बॉयफ्रेंडवरून दोन्ही तरुणींमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही तरुणी एकमेकांना बोलण्यासाठी स्टेडियमच्या बाहेर आल्या होत्या. दोन्ही तरुणींमध्ये संवाद सुरू असताना अचानक वाद झाला आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

दरम्यान, दोन्ही तरुणी एकमेकांना मारहाण करत केस ओढत असताना तरुणींच्या इतर दोन मित्रांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. दरम्यान, एका तरुणीला तेथून दूर नेण्यात आलं, मात्र दुसरी तरुणी भांडण मिटल्यानंतरही शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हती. या प्रकरणाबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार करण्यात आलेली नसली तरी, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com