ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांनी चालवला चरखा! ब्रिटिश PM यांना खास भेट

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.
Boris Johnson India Visit
Boris Johnson India VisitTwitter/@ANI

गुजरात: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर (Boris Johnson India Visit) आहेत. आज सकाळी त्यांचे अहमदाबादच्या विमानतळावर स्वागत झाले. यानंतर पंतप्रधान जॉन्सन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) दिल्लीला भेट घेणार आहेत. आज त्यांनी अहमदाबादच्या साबरमती आश्रमाला ( Boris Johnson Sabarmati Ashram Visit) भेट दिली.

या भेटीदरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेश पटेलही (Bhupesh Patel) त्यांच्यासोबत होते. यावेळी बोरीस जॉन्सन यांनी चरख्यावर सूत कातले आहे. वृत्तसंस्थेने याबाबतचा व्हिडीओही शेअर केला आहे. यावेळी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची शिष्य मेडेलीन स्लेड उर्फ मीराबेन यांची आत्मकथा साबरमती आश्रमाच्या वतीने बोरीस जॉन्सन यांना भेट म्हणून देण्यात आली आहे. महात्मा गांधी यांनी लिहिलेल्या पहिल्या दोन पुस्तकांपैकी हे एक पुस्तक.

भारत दौऱ्यादरम्यान, त्यांचा दौऱ्याचे प्रमुख आकर्षण हे मोदींसोबत होणारी भेट. परंतु या भेटीआधी त्यांनी गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या. साबरमती आश्रमासोबतच बोरीस जॉन्सन हे गांधीनगरच्या अक्षरधाम मंदिलाही भेट देतील. तसेच वडोदराजवळ असलेल्या एका जेसीबी कंपनीला भेट देणार यानंतर दिल्लीत त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उद्या शुक्रवारी भेट होईल.

मोठ्या गुंतवणुकीची शक्यता;

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादेत ब्रिटेनचे पंतप्रधान बॉरीस जॉन्सन प्रमुख उद्योगपतींचीही भेट घेणार आहेत. भारत आणि ब्रिटेन (India And Britain) यांच्या चांगल्या संबंधांतून व्यवहार वाढावा आणि अर्थकारणावर चर्चा होऊ शकते त्यामुळे ही भेट महत्वाची ठरू शकते. तसेच ब्रिटेनकडून भारतात वेगवेगळ्या उद्योगांमध्ये गुंतवणूक केली जाण्याचीही घोषणा या दौऱ्यादरम्यान ब्रिटनच्या पंतप्रधानांकडून केली जाऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com