Viral Photo: या पठ्ठ्याने तब्बल १२ तास आपल्या वडिलांना खांद्यावर वाहिलं! कारण ऐकून थक्क व्हाल...

Viral Photo From Brazil: ब्राझील देशातील एक फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होतोय. यात एक मुलगा आपल्या वृद्ध वडिलांना पाठीवर घेऊन कुठेतरी नेताना दिसतंय.
Viral Photo of Brazil Man carries father on his back for 6 hours
Viral Photo of Brazil Man carries father on his back for 6 hoursInstagram/ @erikjenningssimoes

ब्राझिलिया, ब्राझील: कोरोना महामारीला दोन वर्षांहून अधिक काळ झाला, तरीही जगात कोरोनाचा कहर सुरुच आहे. त्यात अमेरिका, ब्राझील, भारत या देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या देशातील सरकार आपापल्या नागरिकांच्या लसीकरणावर (Vaccination) जास्त भर देत आहे. नागरिकांनाही आता लसीचे महत्व लक्षात येत आहे. ब्राझील (Brazil) देशातील एक फोटो सध्या सर्वत्र व्हायरल (Viral Photo) होतोय. यात एक मुलगा आपल्या वृद्ध वडिलांना पाठीवर घेऊन कुठेतरी नेताना दिसतंय. (Man carries father on his back for 6 hours for COVID vaccine in Brazil)

हे देखील पहा -

या फोटोबद्दल अधिक माहिती घेतली असता लक्षात आलं की, हा फोटो ब्राझिलियन अ‍ॅमेझॉनच्या जंगलातला टिपलेला फोटो चांगलाच व्हायरल होतोय. हा फोटो डॉक्टर एरिक जेनिंग्स सिमोस (Erikjennings Simoes) यांनी क्लिक केला आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केला. यात ते म्हणाले की, ब्राझीलमधील अ‍ॅमेझॉनच्या जंगलात (Amazon Jungle) हा स्थानिक तरुण आपल्या वृद्ध वडिलांना थेट पाठीवरुन घेऊन गेला. त्याचं कारण म्हणजे कोरोना लस! होय, आपल्या वडिलांना कोरोनापासून सुरक्षित करावं यासाठी टॅवी (Tawy) नावाच्या या तरुणाने त्याच्या वृद्ध वडिलांना पाठीवर घेत तब्बल सहा तासांचा पायी प्रवास करत लसीकरण केंद्र गाठलं आणि त्याच्या वडिलांचं लसीकरण करवून घेतलं.

लस घेतल्यानंतर टॅवीने पुन्हा आपल्या वडिलांना पाठीवर घेत सहा तासांचा परतीचा प्रवास केला. म्हणले लसीकरण केंद्रावर जातानाचे सहा तास आणि लसीकरण केंद्रावरुन घरी परतण्याचे सहा तास असे तब्बल बारा तास या पठ्ठ्याने त्याच्या वडिलांना पाठीवर घेत प्रवास केला. हा प्रवास करताना त्याला अनेक टेकड्या आणि नाले असे अनेक अडथळे पार करावे लागले. पण, त्याने अखेर आपल्या वडिलांना कोरोनची लस दिलीच. हा फोटो २०२१ मधला आहे.

Viral Photo of Brazil Man carries father on his back for 6 hours
...अन् तरुणाने मृत्यूला दिला चकवा; पहा काळजाचा ठोका चुकवणारा थरारक Video

एकीकडे आपल्याकडे लसीकरणाच्या अनेक सोयी-सुविधा असतानाही नागरिकांकडून लस घेण्यास टाळाटाळ केली जाते. अनेत सुशिक्षित नागरिकही लस घेण्यास टाळाटाळ करतात मात्र ब्राझीलमधील एका खेडेगावातील या आदिवासी तरुणाने मात्र आपल्या वडिलांना सहा तास पाठीवर नेत त्यांचे लसीकरण केले आहे. टॅवीचा आणि त्याच्या वडिलांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत असून त्याचं सर्वत्र कौतुक होतंय.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com