LPG गॅस सिलिंडरमध्ये मोठा बदल; प्रत्येक सिलिंडरवर येणार QR कोड, ग्राहकांना काय होईल फायदा?

गॅस सिलिंडरवर लावण्यात येणार क्यूआर कोड
LPG Gas cylinders News
LPG Gas cylinders News Saam TV

LPG Gas cylinders News |एलपीजी गॅस सिलिंडरबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने गॅस सिलिंडरबाबत काही बदल केले आहेत. नागरिकांना गॅस सिलिंडरची अधिक माहिती मिळवता यावी या उद्देशाने क्यूआर कोडची सुविधा पुरवली जाणार आहे. जागतिक एलपीजी सप्ताह २०२२ कार्यक्रमात याविषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह देखील उपस्थित होते. गॅस सिलिंडरवर लावण्यात येणारा क्यूआर कोड हा एक ऐतिहासिक बदल आहे. याने ग्राहकांना सिलिंडर ट्ऱॅक करणे आणि त्यावरील सर्व माहिती मिळवणे सहज सोपे होईल, असे हरदीप सिंह म्हणाले.

LPG Gas cylinders News
CNG Gas Hike: मुंबईत पुन्हा CNG आणि PNGगॅसच्या दरात वाढ;सामान्य जनता चिंतेत !

क्यूआर कोडचा असा होईल फायदा

एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरवर क्यूआर कोड लावल्याने सर्वच ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. यात तुम्ही सिलिंडर बुक केल्यानंतर तो कुठे पोहचला, सिलिंडर रिफिल कुठे करण्यात आला, याची माहिती तुम्हाला समजू शकेल. तसेच अनेकदा गॅस सिलिंडर खरेदी केल्यावर त्यामध्ये वायसर खराब असल्याचे प्रकार घडतात. याने गॅस लिक होतो आणि गॅसचा जास्त वासही येतो. त्यामुळे क्यूआर कोडमध्ये या विषयीची सर्व माहिती तुम्ही आधीच तपासू शकता.

LPG Gas cylinders News
LPG Cylinder Price : महागाईतून मोठा दिलासा, गॅस सिलेंडर झाला तब्बल 'इतक्या' रुपयांनी स्वस्त

तीन महिन्यात क्यूआर कोड गॅस सिलिंडरवर

सरकारमार्फत ही घोषणा केल्यानंतर कामाला देखील गती आली आहे. पुढील तीन महिन्यांत प्रत्येकाच्या घरी गॅस सिलिंडरला (Gas cylinders) क्यूआर कोड असणार असे इंडियन ऑइलचे अध्यक्ष श्रीकांत माधव यांनी सांगितले आहे. सध्या हा क्यूआर कोड सिलिंडरवर लेबल स्वरूपात येणार आहे. तर नवीन सिलिंडरवर वेल्डींगमध्येच क्यूआर कोड देण्यात येणार आहे. आतापर्यंत एकूण २० हजार एलपीजी सिलिंडरवर क्यूआर कोड लावले गेले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com