DRDO Video: भारतीय शास्त्रज्ञांची कामगिरी; विनापायलट उडणाऱ्या विमानाची यशस्वी चाचणी

Autonomous Flying Wing Technology Demonstrator Viral Video: वैमानिकाशिवाय उड्डाण केलेल्या या विमानाने उड्डाण करण्यापासून ते लँडिंगपर्यंतची सर्व कामे स्वतःच केली.
Autonomous Flying Wing Technology Demonstrator Viral Video
Autonomous Flying Wing Technology Demonstrator Viral Videohttps://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1838507

बेंगळुरू: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला (डीआरडीओ) अत्याधुनिक मानवरहित विमान विकसित करण्यात एक मोठे यश मिळाले आहे. DRDO ने ऑटोनॉमस (स्वायत्त) फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरचे पहिले उड्डाण यशस्वीरित्या पार पाडले आहे. वैमानिकाशिवाय उड्डाण केलेल्या या विमानाने उड्डाण करण्यापासून ते लँडिंगपर्यंतची सर्व कामे स्वतःच केली. डीआरडीओने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटकातील चित्रदुर्गातील एरोनॉटिकल टेस्ट रेंजमध्ये शुक्रवारी हा सराव करण्यात आला. (DRDO Autonomous Flying Wing Technology Demonstrator Video Viral)

हे देखील पाहा -

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, डीआरडीओने निवेदनात म्हटले आहे की, विमानाचे उड्डाण खूप चांगले होते. हे उड्डाण पूर्णपणे स्वयंचलित (Automatic) होते. यामध्ये टेक-ऑफ, वे पॉइंट नेव्हिगेशन आणि स्मूथ टचडाउन समाविष्ट आहे. हे उड्डाण भविष्यातील मानवरहित विमानाच्या विकासासाठी महत्त्वाचे तंत्रज्ञान साध्य करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल. अशा धोरणात्मक संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

DRDO अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या UAV चे डिझाईन DRDO अंतर्गत बेंगळुरू येथील प्रमुख संशोधन प्रयोगशाळा एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ADE) ने तयार केले आहे. त्याचा विकासही एडीईने केला आहे. हे एक छोटे मानवरहित विमान आहे. यात टर्बोफॅन इंजिन आहे. एअरफ्रेम आणि खालची रचना, चाके, उड्डाण नियंत्रण आणि एव्हीओनिक्स प्रणाली या सर्व गोष्टी भारतात बनवल्या जातात.

Autonomous Flying Wing Technology Demonstrator Viral Video
OnePlus Nord 2T 5G झाला भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

संरक्षणमंत्र्यांनी ट्विट करून अभिनंदन केले

डीआरडीओच्या या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, चित्रदुर्ग एटीआरच्या वतीने ऑटोनॉमस फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरच्या पहिल्या यशस्वी उड्डाणाबद्दल अभिनंदन. स्वायत्त विमाने तयार करण्याच्या दिशेने ही मोठी उपलब्धी आहे. यामुळे महत्त्वाच्या लष्करी यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने आत्मनिर्भर भारत मोहिमेचा मार्ग मोकळा होईल. (DRDO Updates | Successful Maiden Flight of Autonomous Flying Wing Technology Demonstrator)

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com