म्हशींचा कळप आडवा आल्याने मुंबईहून गांधीनगरला जाणार्‍या वंदे भारत एक्स्प्रेसचा अपघात

एक्स्प्रेसचा अपघात वटवा आणि मणिनगर यादरम्यान झाला असून अपघातात रेल्वे इंजिनाच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
Vande Bharat Express
Vande Bharat ExpressSaam TV

Vande Bharat Express: म्हशींचा कळप रुळावरती आडवा आल्यामुळे मुंबई ते गुजरातमधील गांधीनगर येथे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा आज सकाळी ११ च्या दरम्यान अपघात झाला आहे. (Vande Bharat Express Accident)

हा अपघात वटवा आणि मणिनगर यादरम्यान झाला असून अपघातात रेल्वे इंजिनाच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल (Mumbai Central) येथून गांधीनगरला जाणारी वंदे भारत एक्स्प्रेससमोर आज सकाळी वटवा आणि मणिनगर दरम्यान एकस्प्रेससमोर अचानक म्हैशींचा कळप आला.

पाहा व्हिडीओ -

भरधाव असणारी ही ट्रेन म्हैशींचा कळपाला धडकल्यामुळे रेल्वे इंजिनच्या पुढील भागाचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने रेल्वेमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ पीआरओ जे.के. जयंती यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 3o सप्टेंबर रोजी वंदे भारत या एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com