Viral Video: अबब! रस्त्यावर धावतोय चक्क चाक नसलेला ट्रक; व्हिडिओ पाहून हादरून जाल

एका व्यक्तीने चक्का चाक नसलेला ट्रक भरधाव वेगात चालवला आहे.
Viral Video
Viral VideoSaam TV

Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच अतरंगी गोष्टी व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ विरंगुळा म्हणून एकदा पाहायला सुरुवात केली की तासंतास कसे निघून जातात हे लक्षात येत नाही. वाहनांवर स्टंटबाजी करतानाचे अनेक व्हिडिओ तुम्ही आजवर पाहिले असतील. यातील अनेक व्हिडिओ काळजात धडकी भरवणारे असतात. अशात सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला भीतीही वाटेल आणि हसूही आवरणार नाही.

चारचाकी असो अथवा दुचाकी किंवा मग मोठा आठ चाकांचा ट्रक, यातलं एक चाक जरी नसलं तरी वाहन चालवणे कठीण आहे. मात्र एका व्यक्तीने चक्का चाक नसलेला ट्रक भरधाव वेगात चालवला आहे. ट्रकचा वेग पाहून तो दोन चाकांशिवय चालत आहे असं मुळीच वाटत नाही. सध्या सोशल मीडियावर या ट्रकची भलतीच चर्चा रंगली आहे.

Viral Video
Army Truck Accident: भारतीय लष्कराच्या गाडीला भीषण अपघात, 16 जवान शहीद

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कोणतीही भीती न बाळगता अगदी सहज ट्रक चालवत आहे. हा ट्रक आठ चाकांचा आहे. मात्र यातील दोन चाकं गायब झाली आहेत. तरीही ट्रकचालक एवढा मोठा ट्रक अगदी सहज चालवताना दिसत आहे. नेटकरी हा व्हिडिओ पाहून थक्क झालेत. असं कसं काय होऊ शकतं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

'fun_zone_91' नावाच्या एका ट्वीटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ४.८ दशालक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरी यावर कमेंट करत वाहनचालकाला अपघात होऊ शकतो असे सांगत आहेत. तर एकाने हसत हसत पवार ऑफ इंडियन ड्रायवर असं म्हटलं आहे. ट्रक चालवला खरा पण आता रस्त्यावर टर्न कसा घेणार? असा प्रश्न एकाने विचारला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com