संतापजनक! अल्पवयीन मुलीवर ८ महिने ८० नराधमांनी केला बलात्कार

पीडित मुलीवर आठ महिन्यांत तब्बल ८० हून अधिक पुरुषांनी सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे.
Crime
CrimeSaam TV

नवी दिल्ली : देशातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असतानाच, एका अल्पवयीन मुलीवरती ८० जणांकडून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. सदरची घटना आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) गुंटूर पोलिसांनी उघटकीस आणली असून त्यांनी १३ वर्षीय पीडितेची सुटका केली आहे. मात्र, पोलिसांच्या तपासातून माणुसकीला काळीमा फासणारी माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या (Police) माहितीनुसार या मुलीवर आठ महिन्यांत तब्बल ८० हून अधिक पुरुषांनी सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचं तपासात उघड झालं आहे. या ८० जणांमध्ये बी.टेकच्या विद्यार्थ्याचा देखील सहभाग असून या विद्यार्थ्यासह आत्तापर्यंत 80 जणांना पोलिसांनी अटक केली असून, फरार असलेल्या आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.

Crime
नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून शिक्षणाधिकाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

पीडित मुलीची आई कोरोना (Corona) साथीमध्ये दवाखान्यात असताना तिचा उपचाऱ्यादरम्यान मृत्यू झाला होता. मात्र या पीडित मुलीच्या आई आजारी असतना आजारादरम्यान तिच्या आईशी सवर्ण कुमारी या महिलेने मैत्री केली होती आणि नंतर तिनेच या पीडित मुलीला दत्तक घेतलं आणि मुलीच्या वडिलांना कळू न देता ती या मुलीला घेऊन गेली होती.

ऑगस्ट 2021 मध्ये मुलीच्या वडिलांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शोध घेत मुख्य आरोपी महिलेची सवर्णा कुमारी अशी ओळख पटवली. या सर्व प्रकरणात पहिली अटक जानेवारीमध्ये करण्यात आली होती आणि मंगळवारी, 19 एप्रिल रोजी गुंटूर पश्चिम विभागीय पोलिसांनी बीटेकच्या विद्यार्थ्यासह आणखी 10 जणांना अटक केली. आरोपी आणि पीडितेची चौकशी केल्यावर, पोलिसांनी पीडितेच्या परिस्थितीचे भयानक आणि धक्कादायक वास्तव शोधून काढले. त्यानुसार गेल्या ८ महिन्यांपासून या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील वेगवेगळ्या वेश्यागृहात देहव्यापारासाठी पाठवलं जायचं. त्याआधारे पोलिसांनी मुलीला पळवून नेणारी सवर्णा कुमारी ही अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणारी मुख्य आरोपी म्हणून ओळख पटली असून पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com