#EstherHnamte पाच वर्षांची मुलगी गातेय, जन गण मन, पहा व्हिडीओ

ही मुलगी मिझोरमची आहे आणि सैन्याच्या गणवेशात राष्ट्रगीत गात आहे.
#EstherHnamte पाच वर्षांची मुलगी गातेय, जन गण मन, पहा व्हिडीओ
#EstherHnamte पाच वर्षांची मुलगी गातेय, जन गण मन, पहा व्हिडीओ

'जन गण मन अधिनायक जय हे ... भारत भाग्य विधाता ...' राष्ट्रगीत ऐकलं की प्रत्येक भारतीय स्तब्ध उभा राहणारच. खरंतर स्वातंत्र्यदिनाला आता १५ दिवस होत आले. पण सोशल मिडीयावर एका 5 वर्षांच्या मुलीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ही मुलगी मिझोरमची आहे आणि सैन्याच्या गणवेशात राष्ट्रगीत गाताना दिसत आहे. खुद्द मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांना या मुलीचा व्हिडिओ इतका आवडला त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरुन हा व्हिडीओ शेअर केला.

पहा व्हिडीओ -

तुम्हाला आठवत असेल तर या मुलीचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात तिने जन गण मन गायले. मुलीचे नाव एस्तेर हनमते असे आहे. एस्तेरने 3 आसाम रायफल्ससह मिझोरामच्या लुंगलेई येथे राष्ट्रगीत गायले. हा व्हिडिओ 13 ऑगस्ट रोजी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अपलोड करण्यात आला होता.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com