Kerla Accident : केरळमध्ये भीषण अपघात; चार विद्यार्थ्यांसह 9 जणांचा मृत्यू

मृतांमध्ये पाच विद्यार्थी, एक शिक्षक आणि तीन केएसआरटीसी सदस्यांचा समावेश आहे.
Kerla Accident : केरळमध्ये भीषण अपघात; चार विद्यार्थ्यांसह 9 जणांचा मृत्यू

पलक्कड : केरळमधील (Kerla Accident) पलक्कड जिल्ह्यात भीषण रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील दक्कनचेरी भागात केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळ (KSRTC) बस आणि पर्यटक बस यांच्यात जोरदार धडक झाली. ही धकड इतकी जोरदार 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 38 जण जखमी झाले आहेत.

Kerla Accident : केरळमध्ये भीषण अपघात; चार विद्यार्थ्यांसह 9 जणांचा मृत्यू
Shivsena Dasara Melava: कुणाच्या मेळाव्याला किती गर्दी? मुंबई पोलिसांच्या आकडेवारीने नवा वाद

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री वडक्कनचेरीजवळील मंगलम येथे शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या पर्यटक बसने KSRTC बसला पाठीमागून धडक दिली. धडकेनंतर बस दलदलीत कोसळली. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला. (Maharashtra News)

मृतांमध्ये ५ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश

अपघातात जखमी झालेल्या 38 जणांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये पाच विद्यार्थी, एक शिक्षक आणि तीन केएसआरटीसी सदस्यांचा समावेश आहे. मात्र हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Kerla Accident : केरळमध्ये भीषण अपघात; चार विद्यार्थ्यांसह 9 जणांचा मृत्यू
Shivsena Dasara Melava Updates: सत्ता गेल्यावर शाखाप्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिकांची आठवण; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

बुधवारी रात्री 11.30 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग 544 वर हा अपघात झाला. एर्नाकुलम येथील बॅसिलिओस विद्यानिकेतन वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन पर्यटक बस उटीच्या दिशेने निघाली होती. त्याचवेळी KSRTC ची सुपरफास्ट बस कोट्टारक्कराहून कोईम्बतूरला जात होती. मात्र दोन्ही बस आपल्या निश्चित स्थळी पोहोचण्याआधीच अपघातग्रस्त झाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com