मणिपूरमध्ये भूस्खलन; आतापर्यंत 7 जवानांसह 14 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
Manipur Landslide
Manipur LandslideSaam Tv

Manipur Landslide: मणिपूरमध्ये (Manipur) गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या भागात भूस्खलनाची अनेक घटना समोर येत आहे. बुधवारी रात्री मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. या घटनेत सात जवानांसह 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर ढिगाऱ्याखाली अद्याप अनेक जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना घडली तेव्हा छावणीत मोठ्या संख्येने सैनिक उपस्थित होते.

तुपुल रेल्वे स्थानकाजवळ भारतीय लष्कराच्या 107 टेरिटोरियल आर्मीचा कॅम्प होता. लँड स्लाईडमध्ये त्या जागेचे मोठे नुकसान झाले आहे. इंफाळ-जिरबिम रेल्वे मार्गाच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कराची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. याच ठिकाणी भूस्खलन झाले आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जवानांना आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत.

हे देखील पाहा -

भूस्खलनानंतर मणिपूर सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी भूस्खलनाची माहिती घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. सध्या तेथे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. सीएम बिरेन सिंह यांनी सांगितले की, या भागात रुग्णवाहिका आणि डॉक्टर पाठवण्यात आले आहेत.

मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी दुःख व्यक्त केलं

याबद्दल मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी दुःख व्यक्त केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोन करून घटनेची माहिती घेतली. तसेच शक्य ती मदत करण्याचं आश्वासन दिल आहे, अशी माहिती बीरेन सिंह यांनी दिली आहे.

Manipur Landslide
मोठा दिलासा! कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या नवीन दर

पंतप्रधान मोदी यांनी दुःख व्यक्त केलं

पंतप्रधान मोदी यांनी देखील या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी या घटनेबद्दल मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांशी फोन वरून चर्चा केली आणि भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यासोबतच त्यांनी केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com