Delhi News : दिल्लीतील भयावह मृत्यूचा गुंता वाढला; अजूनही १० प्रश्न अनुत्तरीत

दिल्ली पोलिसांनी नवीन माहिती दिलेल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Delhi News
Delhi NewsANI

शिवाजी काळे

Delhi Crime Update : ३१ डिसेंबर रोजी एकीकडे जग नवीन वर्षाचे स्वागत करत होते त्याच वेळी राजधानी दिल्लीत ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली. दिल्लीतील कांझावाला भागात रात्री कारमधून जाणाऱ्या काही तरुणांनी एका स्कूटीस्वार तरुणीला धडक दिली. यात तरुणी कारलाच अडकून राहिली आणि सुमारे १३ किलोमीटर रस्त्यावर फरफटत गेली. ती पूर्णपणे रक्तबंबाळ झाली होती. तर रस्त्यावर फरफटत गेल्याने तिचे कपडेही फाटले. रक्तबंबाळ झालेली मुलगी रस्त्यावर पडून तिचा मृत्यू झाला. देशभरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, आता या घटनेत आज दिल्ली पोलिसांनी नवीन माहिती दिली आहे. यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ( Latest Delhi Crime Update)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ही घटना घडली तेव्हा आणखीन एक मुलगी पीडितेबरोबर त्या ठिकाणी उपस्थित होती. कलम १६४ नुसार या मुलीचा जवाब नोंदवला जात आहे. आरोपींना शिक्षा करण्यासाठी हा मोठा पुरावा आहे. असा दावा पोलिसांनी केला आहे. दिल्ली पोलिसांनी ९० सेकंदाची पत्रकार परिषद घेत म्हटले आहे की, समोर आलेल्या सीसीटीव्हीमध्ये मृत मुलगी रात्री सव्वा दोन वाजता स्कूटी चालवताना दिसत आहे. यावेळी तिच्या सोबत तिची मैत्रीण आणि दोन तरुण देखील असल्याचं या सीसीटीव्हीमधून पाहायला मिळत आहे. या तरुणांशी बातचीत करून या दोनही मुली गाडीवरून या ठिकाणाहून निघून जातात, त्यानंतर ही दोन मुलंही या मुलीच्या गाडीमागे गेल्याचं दिसत आहे.

सीसीटीव्हीमधून मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणी तिच्या मित्रांसोबत नवीन वर्षाची पार्टी करण्यासाठी गेली होती. पार्टी दरम्यान तिचा तिच्या मित्रांसोबत वादही झाला. ती आणि तिची मैत्रीण या ठिकाणाहून निघाल्या. पुढे त्यांचा अपघात झाला. अपघातात पीडिता गाडीच्या अॅक्सेलला अडकली. तिच्या मैत्रिणीला किरकोळ दुखापत झाली. त्या ठिकाणाहून ती घरी गेली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे प्रश्न अजून अनुत्तरीत

  • ज्या पद्धतीने ही घटना सांगितली जात आहे. यात किती तथ्य आहे?

  • पीडिता आणि तिचे मित्र ज्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज घेण्यासाठी पोलिस तात्काळ कसे आले?

  • मृत्यूनंतर तिची मैत्रीण समोर का आली नाही?

  • अपघात झाल्यानंतर मैत्रीणीने पोलिस अथवा नातेवाईकांना का सांगितले नाही?

  • पीडितेबरोबर हॉटेलवर असणारे 'ते' मित्र कोण होते?

  • पोलिसांना या संदर्भात माहिती देणाऱ्या लोकांकडे पोलिसांनी दुर्लक्ष का केले?

  • दिल्ली पोलिस पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देणं का टाळत आहेत?

  • दिल्ली पोलिसांनी ९० सेकंदाची पत्रकार परिषद का घेतली?

  • चार चाकी खाली एक मुलगी अडकलेली असताना १२ ते १३ किलोमीटर आरोपींना कसं समजलं नाही?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com