वसईच्या सागरी किनारी पुन्हा सापडला महिलेचा मृतदेह!

वसईच्या पश्चिमेच्या भुईगाव सागरी किनारी सुटकेस मध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वसईच्या सागरी किनारी पुन्हा सापडला महिलेचा मृतदेह!
वसईच्या सागरी किनारी पुन्हा सापडला महिलेचा मृतदेह!Saam Tv

चेतन इंगळे

वसई विरार : वसईच्या Vasai पश्चिमेच्या भुईगाव सागरी किनारी सुटकेस मध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत वसई पोलिसांनी Police मृतदेह ताब्यात घेवून पुढील तपास सुरु केला आहे.

हे देखील पहा-

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सोमवारी सकाळी भुईगाव समुद्र किनारी वाहून आलेल्या एका सुटकेस मध्ये ३० ते ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. यात मृत महिलेचे डोकं च नाही आहे. तर पाण्यामुळे मृतदेह कुजला असल्याने याची ओळख पटणे पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे. पोलिसांनी अज्ञात इसमांच्या विरोधात हत्तेचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी दिली.

वसईच्या सागरी किनारी पुन्हा सापडला महिलेचा मृतदेह!
'भीक' मागायला आणलेल्या अस्लम काकांना जायचंय घरी !

वसईच्या सागरी किनारी हा महिनाभरातील चौथा मृतदेह आहे. या अगोदर वसईतील बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह आढळला होता. त्या नंतर एका इसमाचा मृतदेह सापडला होता.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com