Western Railway News : पश्चिम रेल्वेची मोठीच कारवाई! फुकट्यांकडून वसूल केला १६ कोटींचा दंड

पश्चिम रेल्वेची मोठीच कारवाई! फुकट्यांकडून वसूल केला १६ कोटींचा दंड
Western Railway News
Western Railway Newssaam tv

Western Railway News : मुंबईत जशी लोकांची गर्दी वाढत आहे, तशीच गर्दी पश्चिम रेल्वेचा उपनगरीय रेल्वेमार्गावरही वाढत दिसत आहे. यातच आता रेल्वेने विनातिकिट प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.

अशा विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध रेल्वेतर्फे वारंवार कारवाई करण्यात येते. पश्चिम रेल्वेने एप्रिल २०२३ मध्ये अशातच फुकट्या प्रवाशांत कारवाई करत तब्बल १६.७६ कोटी रुपये वसूल केले आहेत.

Western Railway News
Ajit Pawar Vs Nana Patole : राजीनाम्यावरून अजित पवार आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली, मविआमध्ये विसंवाद वाढतोय का?

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात ८३,५२२ प्रकरणे शोधून ४.७१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. एसी लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी नियमित कारवाई करण्यात येत आहे. (Breaking Marathi News)

या मोहिमांच्या परिणाम म्हणून एप्रिल २०२३ मध्ये ६३०० हून अधिक अनधिकृत प्रवाशांना दंड आणि २१.३४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत २३८.१९% नी वाढला आहे.

Western Railway News
Explainer : सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदे-फडणवीस सरकारसाठी दिलासादायक कसा?

Western Railway News : गेल्या वर्षभरात २७. ७० लाख फुकट्या प्रवाशांत कारवाई

दरम्यान, गेल्या वर्षभरात पश्चिम रेल्वेचा उपनगरीय रेल्वेमार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या २७. ७० लाख फुकट्या प्रवाशांत कारवाई करत तब्बल १५८ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

याशिवाय केवळ दोन तिकीट तपासणीसांच्या विनातिकीट प्रवासी तपासणीतून २ कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com