पुण्यातील वेदीकाला दिले 16 कोटीचे इंजेक्शन

कोरोनासारख्या कठीण काळातही महाराष्ट्राने माणुसकी जपली आणि एका चिमुकलीचा जीव वाचविण्यासाठी थोडा नाहीतर तब्बल 16 कोटी रुपयांचा निधी उभा केला आहे.
वेदिका शिंदे
वेदिका शिंदे गोपाळ मोटघरे

पिंपरी - कोरोनासारख्या कठीण काळातही महाराष्ट्रांन माणुसकी जपली आणि एका चिमुकलीचा जीव वाचविण्यासाठी थोडा नाहीतर तब्बल 16 कोटी रुपयांचा निधी उभा केला आहे.

पिंपरी - चिंचवड शहरातली ही गोडस छकुली आता महाराष्ट्राची लेक म्हणून ओळखली जाणार आहे. कारण वेदीका शिंदेला झालेल्या SMA म्हणजेच Spinal Muscular Atrophy Type- 1 ह्या अतिशय दुर्धर आजारातुन वाचविण्यासाठी अख्खा महाराष्ट्र धावून आला. वेदिका पाच महिण्याची असतांना तिला SMA टाईप-1, ह्या आजाराने ग्रासल्याच निष्पन्न झालं होतं. हा आजार ज्याला झाला त्याचं वय वाढण्या बरोबरच शरीरातील एकेक अवयव निकामी करत जातो. त्यामुळे निदान होताच या आजारावर उपचार करणे गरजेच असते. त्यासाठी झोलगेन्स्मा (Zolgensma) ही लसच एकमेव रामबाण उपाय आहे. हे कळाल्यावर वेदीकाच्या आई बाबाने जीवाचं रान केलं.

हे देखिल पहा

मात्र या इंजेक्शनची किंमत 22 कोटी असल्यानं एव्हढी रक्कम जमवायची कशी असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला, मग त्यांनी आपल्या लेकीला वाचविणसाठी महाराष्ट्रांला साद घातली आणि त्या सादेला प्रतिसाद देत सुमारे दीड लाख नागरिकांनी आर्थिक मदत पाठवली.

वेदीकाला आलेली आर्थिक मदत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील सामान्यातल्या सामान्य व्यक्तीने आपली पदरमोड करून पाठवलेली आहे. ज्यातून केवळ 77 दिवसात वेदीकाच्या उपचारासाठी लागणाऱ्या तब्बल 16 कोटी रुपयांच्या मदतीचा डोंगर उभारला आणि महाराष्ट्राने वेदीकाला वाचविण्या बरोबरच जगासमोर आदर्श ठेवला आहे.

मात्र वेदिका प्रमाणेच देशभरात आणखी काही चिमुकलेही या आजाराचा सामना करत आहे. या आजारावर उपचार पद्धतीही उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी लागणारा खर्च सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचा असल्याने आता केंद्र सरकारनेच पुढाकार घेऊन SMA टाईप -1 आजारावरील उपचार पद्धती मोफत केल्यास हे कोवळे जिव जे उद्याचं भविष्य आहेत त्यांना आपण वाचूऊ शकू. vedika shinde from pune was given 16 crore vaccine

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com