Pune: मंदिरे नव्हेत, पूर्वी दर्गाच होते; इतिहासकारांचा दावा

पुण्यात दर्ग्याच्या जागी पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरे होती असा दावा हिंदूत्ववाद्यांनी केला आहे.
Punyeshwar and Narayaneshwar
Punyeshwar and NarayaneshwarSaam TV

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे : वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीमध्ये (Gyanvapi Masjid) शिवलिंग सापडल्याच्या चर्चा सध्या देशभर सुरु आहेत. मुस्लीम समुदायातील काही नेत्यांनी या ठिकाणी मशिद असून केवळ २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे प्रकरण तापवलं जात असल्याचं म्हंटलं आहे. तर या ठिकाणी मंदीरच असल्याचा दावा हिंदुत्ववादी पक्षांकडून केला जात आहे. त्यामुळे ज्ञानवापी मशिदीवरुन देशातील दोन गटांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. हे कमी की काय म्हणून आता पुण्यात देखील मशिद का मंदिर? असा नवा वाद सुरु झाला आहे.

पुण्यात (Pune) दर्ग्याच्या जागी पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरे (Punyeshwar and Narayaneshwar Temple) होती, असा दावा हिंदूत्ववाद्यांनी केला आहे. मनसे (MNS) नेते अजय शिंदे यांच्या या दाव्यानंतर आता शहरातील वातावरण चांगलंच तापलं असून ब्राम्हण महासंघानेही या वादात उडी घेतली आहे. 'लवकरच पुण्येश्वर मंदिराच्या जागी उभारण्यात आलेला दर्गा हटवून त्याजागी मंदिर उभारू, अस वक्तव्य ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी केलं आहे. तसंच मनसे, हिंदू महासंघ यांनी मंदिर निर्माणासाठी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.

हे देखील पाहा -

मात्र, हिंदुत्ववाद्यांच्या या दाव्यांबाबत इतिहास संशोधकांना विचारले असता "इथे पूर्वी मंदिर नसून दर्गेच होते. या परिसरात शहाजी राजे (Shahaji Raje) यांची जहागीरी होती. नंतर पेशवाई आली त्यांनी दर्ग्याला देणगी दिली. त्यामुळे या जागी मंदिर नसून दर्गाच असल्याचा दावा इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी केला आहे." दरम्यान, दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे होत असताना हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाचा निकाल काय येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com