Mumbai Crime News: अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पतीने केलं धक्कादायक कृत्य, पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून हत्या

Sewri Police Station: ही धक्कादायक घटना शिवडीच्या (Sewri) चांदणी चौक परिसरात घडली आहे.
Sewri Police Station
Sewri Police StationSaam Tv

सुरज सावंत, मुंबई

Mumbai News: मुंबईमध्ये गुन्हेगारीच्या (Mumbai Crime) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशामध्ये शिवडीमध्ये पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या (immoral relationship) संशयावरुन पत्नीची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना शिवडीच्या (Sewri) चांदणी चौक परिसरात घडली आहे.

Sewri Police Station
Mission Admission : अकरावी प्रवेशासाठी आठ जूनपासून भरावे लागणार पसंतीक्रम; जाणून घ्या वेळापत्रक

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल सलीम हारून शेख असं आरोपी पतीचे नाव आहे. अब्दुल आपली पत्नी नजराना खातून हिच्यासोबत शिवडीच्या चांदणी चौक परिसरात राहत होता. अब्दुल शिवडी कौलाबंदर येथे वायरमनचे काम करतो. त्याला दारुचे व्यसन लागले होते. सतत दारु पिऊन त्याचे पत्नीसोबत भांडण व्हायचे. तो सतत पत्नीवर अनैतिक संबधावरुन संशय घ्यायचा. त्यामुळे देखील त्यांच्यात सतत वाद होत होता.

Sewri Police Station
TV Actress Blame Her Co-Actor: लग्नाचे वचन दिले आणि... टीव्ही अभिनेत्रीचा सहकलाकारावर गंभीर आरोप

या भांडणाला कंटाळून पत्नी नजरानाने अब्दुलला अनेक वेळा घराबाहेर काढले होते. सततची ही भांडण आणि अनैतिक संबंध याचा राग अब्दुलच्या डोक्यात होता. रविवारी दुपारीही दारूच्या नशेत असलेल्या अब्दुलसोबत नजरानाचे भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की राग अनावर झालेल्या अब्दुलने नजरानाच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये नजराना गंभीर जखमी झाली.

Sewri Police Station
Pune Accident News: पुण्यात भयानक अपघात, स्वच्छता महिला कर्मचाऱ्याला कारने फरफटत नेलं; घटनास्थळावर आक्रोश

रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या नजरानाला तिच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ जेजे रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण उपचारादरम्यान नजरानाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी अब्दुलविरोधात भादवी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलीस चौकशीत पत्नीचे अनैतिक संबध आणि रोजच्या भांडणाल कंटाळून त्याने हे कृत्य केल्याची कबूली दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com