Ambernath Shiv Temple News
Ambernath Shiv Temple NewsSaam Tv

Ambernath Shiv Temple News: अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची अलोट गर्दी, पावसानं वाढवलं मंदिराचं सौंदर्य...

Shravan Month First Monday 2023: अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची अलोट गर्दी, पावसानं वाढवलं मंदिराचं सौंदर्य...

Ambernath Shiv Temple News: अधिक श्रावण मास महिन्यातल्या पहिल्या सोमवारी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली आहे. शिवमंदिराच्या बाहेर भर पावसात रांगा लागल्या आहेत.

अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर हे शिलाहारकालीन असून तब्बल ९६२ वर्ष जुनं आहे. या मंदिरातील महादेवाची अंबरेश्वर, अशी ओळख असून त्यावरूनच अंबरनाथ हे शहराचं नाव पडलं आहे. ठाणे जिल्ह्यातील एकमेव प्राचीन शिवालय असलेलं हे मंदिर शंकराचं अतिशय जागृत स्थान म्हणून ओळखलं जातं.

Ambernath Shiv Temple News
Uddhav Thackeray Group Election Symbol: ठाकरे गटाकडून मशाल चिन्ह जाणार की राहणार? 'या' दिवशी होणार कोर्टात सुनावणी

त्यामुळेच यावेळी प्रत्येक श्रावण महिन्यात या ठिकाणी गर्दी होत असते. मात्र या महिन्यात अधिक श्रावण मासला सुरुवात झाली असून आज या मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांची ही गर्दी शिवमंदिरच्या प्रवेशद्वाराजवळ पर्यंत भर पावसात रांगा लागल्या आहेत. (Latest Marathi News)

तर भाविकांची प्राचीन शिवमंदिरात रीघ लागली होती. भाविकांची गर्दी लक्षात घेता कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्राचीन शिवमंदिराचे पुजारी पाटील कुटुंबीय आणि पोलिसांनी चोख नियोजन ठेवलं होतं.

Ambernath Shiv Temple News
Sharad Pawar News: 'भाजपसोबत जाऊ शकत नाही'; शरद पवारांनी आमदारांसमोर स्पष्ट केली राजकीय भूमिका

खिडकाळी मंदिर ते अंबरनाथच्या शिवमंदिरापर्यंत कावडयात्रा

दरम्यान, डोंबिवलीच्या खिडकाळी मंदिर ते अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरापर्यंत कावड यात्रा भर पावसात काढण्यात आली होती. या यात्रेत अनेक भाविकांनी सहभाग घेतला होता.

भगवान भोलेनाथाच्या ज्योतिर्लिंगावर अधिक श्रावणमास महिन्यात जल अभिषेक करण्यात येतो. अधिक श्रावण मास महिन्यानिमित्त हिंदू युवा वाहिनीच्या माध्यमातून खिडकाळी मंदिर ते अंबरनाथ प्राचीन शिवमंदिर अशी कावड यात्रा भर पावसात काढण्यात आली होती. ही कावड यात्रा अंबरनाथमध्ये पोहोचल्यानंतर प्राचीन शिवमंदिरात भगवान भोलेनाथाला जलाभिषेक घालून ही कावड यात्रा संपन्न झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com