शिवसेना 50 जागा लढवणार, UPमध्ये परिवर्तन निश्चित; राऊतांनी व्यक्त केला विश्वास

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाची भूमिकेबद्दल घेतलेल्या पत्रकार परिषदनंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Sanjay Raut
Sanjay RautSaam T

वैदेही काणेकर

मुंबई : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाची भूमिकेबद्दल घेतलेल्या पत्रकार परिषदनंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना ते म्हणले, शिवसेना युपीत 50 जागा लढेल. तसेच भारतीय जनता पक्षाने (BJP) आता सावधगिरी बाळगावी, कारण युपी (UP) आणि गोव्यामध्ये (Goa) भाजपला गळती लागली आहे, असे ते म्हणाले.

गोव्याच्या निवडणुकीबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, गोव्यात आमचे आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. जर काही मनाप्रमाणे नाही घडले तर आम्ही स्वबळावर लढू. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू आहे. आताच वेणूगोपाळ यांच्याशी चर्चा झाली. एकत्र लढलो तर गोव्यात परिवरर्तन घडवू शकतो, अस शिवसेना नेते संजय राऊत यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना सांगितलं आहे.

Sanjay Raut
Sharad Pawar : यंदा परिवर्तन अटळ; राष्ट्रवादी तीन राज्यात निवडणूक लढवणार!

पूढे ते म्हणाले, सेनेसारखा हिंदू विचारांचा पक्ष आघाडीत असणं चांगलं आहे. गोव्यात तृणमुलसोबत जाणार नाही. भिन्न विचारांच्या पक्षांसोबत एकाचवेळी चर्चा केली नाही. गोव्यात महाविकास आघाडी असावी, जर काँग्रेसची इच्छा नसेल तर मग स्वबळावर लढू असाही संजय राऊत म्हणाले.

गोव्यात निवडणुकीसाठी शिवसेनेची पूर्ण तयारी झाली आहे. गोव्यात भाजपचे मंत्री व आमदाराने भाजप सोडला. म्हणजे गोव्यात भाजप अभेद्य नाही. तर, युपीत भाजपच्या अनेक आमदारांनी सपात (Samajvadi Party) प्रवेश केलाय. याचा अर्थ हवामानाचा अंदाज काही लोकांना आलाय. मौर्य यांना हवेचा अंदाज पटकन येतो. त्यामुळं भाजपन सावध राहावं, असही ते म्हणाले.

हे देखील पहा-

लाटांचे तडाखे बसायला लागलेत. सध्या मंद लाटा आहेत. पण त्या उसळू शकतात व जहाज हेलकावू शकते. शिवसेना युपीत ५० जागा लढेल असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्टपणे सांगितलं. तसेच पुढे त्यांनी सांगितलं, मी उद्या दिल्लीत व परवा युपीत जात आहे. भाजप ओपिनियन पोलच्या माध्यमातून अफवा पसरवत आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. आणि गोवा व युपीत परिवर्तन निश्चित आहे, असाही विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com