'फडणवीसांनी यात पडू नये, नाहीतर सकाळी जे झालं होतं...'; संजय राऊतांचा सल्ला

फडणवीस यांच्याविषयी आम्हाला आदर आहे. असंही संजय राऊत म्हणाले.
Devendra Fadnavis Vs Sanjay Raut
Devendra Fadnavis Vs Sanjay RautSaam TV

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडेल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. सध्या जवळपास 40 आमदारांसह एकनाथ शिंदे हे गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. ते भाजपसोबत (BJP) जात सत्ता स्थापन करणार असल्याचं सांगितलं जातंय. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला (Devendra Fadnavis) एक सल्ला दिला आहे. (Sanjay Raut Latest News)

Devendra Fadnavis Vs Sanjay Raut
Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांनी राजकीय आकसापोटी आमदारांचे संरक्षण काढून घेतले; एकनाथ शिंदेंचे खळबळजनक ट्विट

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधल यावेळी त्यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांना एक सल्ला दिला आहे. “देवेंद्र फडणवीसांना मी एक सल्ला देईन. तुम्ही या गोंधळात पडू नका. पुन्हा एकदा सकाळचं जे काही घडलं होतं, ते संध्याकाळचं होऊन जाईल. तुमची जी काही शिल्लक प्रतिष्ठा आहे, ती सांभाळून ठेवा. या गोंधळात तुम्ही पडू नका, फसाल. आमचं आम्ही बघून घेऊ”, असं राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis Vs Sanjay Raut
कर्तव्य बजावताना ह्रदयविकाराचा झटका; साताऱ्यातील जवानाचे लडाखमध्ये निधन

"शिवसेनेतील बंडखोरी हा पक्षातला विषय आहे. आतापर्यंत कुणी कुणाला पाठिंबा दिलेला नाही. असे असताना विरोधी पक्षनेते नेते देवेंद्र फडणवीस यांनी तर या प्रकरणात लक्षच घालू नये". पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, यापूर्वी सकाळचा शपथविधी झाला होता आता संध्याकाळचा होऊ नये याची त्यांनी खबरदारी घ्यावी. त्यामुळे आता जी उरली-सुरली प्रतिष्ठा आहे ती सांभाळा. असा सल्ला संजय राऊतांनी दिला आहे.

दरम्यान, फडणवीस आणि आमच्यामध्ये जरी राजकीय मतभेद असले तरी फडणवीस यांच्याविषयी आम्हाला आदर आहे. असं म्हणत संजय राऊतांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. पडद्यामागे काहीतरी शिजतंय हेच राऊतांना यामधून सांगायचे होते. पण सल्ला देण्याबरोबरच त्यांच्याबद्दल आदर असल्याचेही ते म्हणाले आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com