Dasara Melava 2022: "पाठीत वार करणाऱ्यांचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही", शिवसैनिकांची उर्जा वाढवणारा टीझर

एकनिष्ठ शिवसैनिकांचा.. पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळावा!', असं कॅप्शन देत शिवसेनेनं टीझर रिलीज केला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray saam tv

Dasara Melava 2022 : शिवसेनेच्या (Shivsena) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या दसरा मेळाव्याचा नवीन टीझर समोर आला आहे. या नव्या व्हिडीओच्या माध्यमातून शिवसैनिकांना साद घालण्यात आली आहे. 'एक नेता, एक झेंडा, एक मैदान... एकनिष्ठ शिवसैनिकांचा.. पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळावा!', असं कॅप्शन देत शिवसेनेनं टीझर रिलीज केला आहे.

Uddhav Thackeray
Breaking News : शिवसेना निवडणूक चिन्हाचा निर्णय अंधेरी पोटनिवडणुकीआधीच?

व्हिडीओच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाला इशाराही दिला आहे. 'छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला शिकवण आहे की, कुणाच्या पाठीत वार करायचा नाही. पण जर कुणी पाठीत वार केला तर त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही', उद्धव ठाकरेंच्या भाषणातील हे वाक्य यात वापरण्यात आलं आहे.

"आज माझ्या हातात अधिकार म्हणून काहीच नाही. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालेली शक्ती आहे. ती शक्ती घेऊन मी पुढे लढायला निघालो आहे. सगळे एकत्र येऊन शिवसेनेवर तुटून पडणार आहेत. हे ठाकरे कुटूंब आहे या संपवा. तुमच्या सगळ्यांच्या हृदयात बाळासाहेब ठाकरे आहेत, या संपवा" अशी भावनिक सादही घालण्यात आली आहे.

Uddhav Thackeray
Udayanraje News : उदयनराजेंचा पवार कुटुंबियावर गंभीर आराेप म्हणाले...,

शिवसेनेवर सगळे तुटून पडणार आहे. मात्र मर्द याच लढाईची वाट पाहत असतो. त्यामुळे दसरा मेळाव्याला उत्साहात, वाजत गाजत या. पण शिस्तीत या, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे.

दसरा मेळाव्याच्या टीझरमध्ये उद्धव ठाकरेंचा आक्रमक बाणा पाहून, दसरा मेळाव्यात काय होणार याची उत्सुकता आता शिवसैनिकांना लागली आहे. त्यामुळे यंदाचा ठाकरे आणि शिंदे गटातील दसरा मेळावा आरोप-प्रत्यारोपांनी गाजणार हे नक्की आहे.

Edited By- Pravin Wakchoure

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com