'आता बोला', संजय राऊतांनी दिले शिवसैनिकांनी बाबरी पाडल्याचे पुरावे

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल भाजपच्या बुस्टर सभेत शिवसेनेवरती (Shivsena) आगपाखड केली.
Sanjay Raut Tweet
Sanjay Raut TweetSaam TV

रश्मी पुराणिक

मुंबई: माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल भाजपच्या बुस्टर सभेत शिवसेनेवरती (Shivsena) आगपाखड केली. मशिदीवरील भोंगे उतरवण्याची हिम्मत नाही आणि म्हणतात बाबरी आम्ही पाडली अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याचबरोबर बाबरी पाडल्यानंतर सर्व आरोपी हे भाजपचेच होते शिवसेनेचा एकही कार्यकर्ता बाबरी पाडण्यासाठी गेला नव्हता असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आता त्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे एक कात्रण आणि अन्य काही वृत्तपत्रातील कात्रणं ट्वीट केले आहे. आणि आता बोला असे म्हटले आहेत.

दरम्यान आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीसांना उत्तर दिले होते. बाबरीच्यावेळी शिवसेना कुठे होती हे तुमच्या नेत्यांना विचारा असे संजय राऊत म्हणाले होते. यावेळी त्यांनी राज ठाकरेंवरतीही निशाणा साधला होता. काल औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी भोंग्यावरुन राज्य सरकारला इशारा दिला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, भोंग्याचा विषय हा कायद्याच्या चौकटीतील आहे. भोंग्याचा मुद्दा काढून मुळ विषयाला बाजूला ठेवण्याचे काम चालू आहे. हे काम काही लोकांकडून भाजप करत असल्याची टीका राऊत यांनी केली.

संजय राऊतांच्या विधानावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी पलटवार केला आहे. बाबरीच्या वेळी राऊत गेले होते का ? तलवारीशिवाय माध्यमांसमोर यायचं आणि मग आयजीच्या जीवावर बायजी उदार, अशी अवस्था आहे. प्रत्यक्ष मैदानात उतरुन संजय राऊत यांनी काम करावं, अशी खरमरीत टीका दरेकरांनी राऊतांवर केली आहे. राऊतांवर टीका करताना दरेकर म्हणाले, काल जे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले त्यात आता अर्ध्या डोक्याचा हा शब्द ऍड झालाय. जी लोकं याठिकाणी नाही त्यांना विचारा असे सांगत सोयीचे बोलायचे आणि वागायचं, हे संजय राउत यांचे काम आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, श्रेयासाठी ती आमची लढाई नव्हती. आता श्रेय कुणी घ्यायचे हे कळलं. असा टोलाही राऊतांना दरेकरांनी लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com